रेल्वे जागरुकता दिवस 
नांदेड

नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरुकता दिवस

नांदेड विभागीय पातळीवर हे मोठे यश आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या वर्षी ८१ लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन केले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जागतिक पातळीवर दर वर्षी रेल्वे लेव्हल क्रॅासिंग जागरुकता दिवस साजरा केला जातो. या वर्षी गुरुवारी (ता. १० ) जून रोजी दिवस पाळला जात आहे. या अंतर्गत नांदेड रेल्वे विभागात विविध ठिकाणी लेव्हल क्रोसिंग गेटवर जागरुकता कार्यक्रम घेण्यात आले.

कोविड-१९ साथीचा रोग सर्व देशभर पसरलेला असूनही, नांदेड रेल्वे विभागाने वर्ष २०२०-२१ मध्ये वर्षभरात पुलाखालील भुयारी रस्ता, पुलावरील रस्त्यांची सोय करीत १२ मानव संचलित लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन केले आहे. नांदेड विभागीय पातळीवर हे मोठे यश आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या वर्षी ८१ लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन केले आहे.

हेही वाचा - एकदा हे वाचाच : पावसाळ्यात "सर्पदंश" होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

दक्षिण मध्य रेल्वेने अत्युच्च दर्जाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे उच्चाटन, मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे रुपांतर मानव- संचलित क्रॉसिंगमध्ये परिवर्तित करणे आणि पुलाखालील भुयारी रस्ता, पुलावरील रस्ते, मर्यादित उंचीचे भुयारी रस्ते तयार करणे यासारख्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. तसेच लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेचे विविध उपाय केले आहेत.

यात नांदेड रेल्वे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी के. सूर्यनारायणा यांच्या नेतृत्वात इंजिनीरिंग विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहायाने कार्यक्रम घेण्यात आले.

येथे क्लिक करा - मृतांमध्ये सख्ख्या बहीण - भावासह चुलत भावाचा समावेश आहे

१. जवळपास चारपेक्षा अधिक जणांना एस.एम.एस. च्या माध्यमातून रेल्वे गेट पार करतांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

२. रेल्वे क्रोसिंगच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जावून सुरक्षेसंबंधी घोषणा देवून जनजागृती करण्यात आली.

३. विविध रेल्वे गेटवर छापील माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

४. विविध रेल्वे गेटवर पोस्टर लावून जनजागृती केली गेली.

५. रेल्वे गेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे कसे कार्य करता येईल याची माहिती दिली.

६. रस्ता वापरकर्त्यांना त्यांची सुरक्षा आणि ट्रेनच्या सुरक्षिततेबद्दल समुपदेशन करून सतर्क करण्यासाठी निवडक व्यस्त लेव्हल क्रॉसिंगवर जनजागृती केली गेली.

नांदेड रेल्वे विभागाने जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीच्या उद्घोषणांचा उपयोग करून लेव्हल क्रॉसिंगच्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे, सुरक्षित राहण्याचे आणि लेव्हल क्रॉसिंग वापरताना जबाबदार राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT