nanded sakal
नांदेड

Nanded : गर्भवती, स्तनदा माता चौरस आहारापासून वंचित ; आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढणार ?

किनवट : तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची सर्वाधिक शक्यता तज्ज्ञ सदस्यांनी व्यक्त केली. त्यासाठी सहायक जिल्हाधिकरी, आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि महिला व बालकल्याण विभागाने समन्वय साधून गर्भवती व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार पुरवण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करावी, आशी मागणी लाभार्थींकडून होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

किनवट : आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अनुसूचित व अतिरिक्त अनुसूचित उपयोजना क्षेत्रात राबवली जात होती. किनवट तालुक्यातील २५० अंगणवाड्या मधून या योजनेअंतर्गत १४ हजार ५५६ गर्भवती व स्तनदामातांना एक वेळ चौरस आहार दिला जात होता. परंतु, अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्यामुळे ता.चार डिसेंबर पासून ही महत्त्वाकांक्षी योजना बंद पडली आहे.

तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची सर्वाधिक शक्यता तज्ज्ञ सदस्यांनी व्यक्त केली. त्यासाठी सहायक जिल्हाधिकरी, आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि महिला व बालकल्याण विभागाने समन्वय साधून गर्भवती व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार पुरवण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करावी, आशी मागणी लाभार्थींकडून होत आहे.

किनवट-माहूर तालुक्यासाठी ५ कोटी ५० लाख

आदिवासी किनवट, माहूर तालुक्यातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी २०२२- २३ या आर्थिक वर्षात ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तो निधी वितरीत करण्यात आला. २०२३- २४ साठी ५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आले.

आदिवासींवर अविश्वास

शासकीय महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बाळंतपणाच्या रजेसारखीच दैनंदिन कष्टाची कामे करणाऱ्या शेतकरी, मजूर आदिवासी महिलांना त्यांच्या कामातून ६ महिने विश्रांती घेऊन बुडीत मजुरी प्रती महिना ५ हजार रुपये त्यांना देण्याची मागणी तज्ज्ञ सदस्य म्हणून सरकारकडे केली होती. त्यामुळे बाळ व बाळंतीण या दोघांनाही त्याचा फायदा झाला असता. बालमृत्यू व उपोषणात कमालीची घट झाली असती. पण आदिवासींच्या हातात नगदी पैसे द्यायचे नाहीत ते कसेही खर्च करतील अशी सबब पुढे करून सरकारने आदिवासींवर दाखविलेला अविश्वास होता.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डॉ. एपीजे अब्दुल कलाम ही योजना मुळात कुपोषित आहे. कारण या योजनेचे बजेट, राबवण्यासाठी अपुरे मनुष्यबळ. आता तर अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे गरोदर, स्तनदा माता आणि बालकांचे पोषण कुपोषणात बदलल्याशिवाय मार्ग नाही.

- डॉ. अशोक बेलखोडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT