शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास sakal
नांदेड

शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

एसटी संप विद्यार्थ्यांच्या मुळावर : अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?

हफीज घडीवाला

कंधार : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी संप पुकारल्याने गेल्या महिन्याभरापासून लालपरीची चाके जाग्यावरच थांबून आहेत. याचा फटका प्रवाशांना तर बसत आहेच, शालेय विद्यार्थ्यांना पण जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर आला असून ऑटो आणि जीपवर बसून त्यांना प्रवास करावा लागत आहे. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीन करून घ्यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून संपावर आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवला असला तरी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे लालपरी आगाराच्या बाहेर काढली जात नाही. संपकऱ्यांची मागणी बरोबर आहे की सरकारची बाजू खरी आहे हा सर्वसामान्यांसाठी संशोधनाचा विषय बनलेला असला तरी सरकार आणि संपकऱ्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी त्रास सोसावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

कोरोनानंतर शहरी भागात आठवी पासून आणि ग्रामीण भागात पाचवी पासून पुढे शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून घरी अडकून पडलेले शालेय विद्यार्थी मोठ्या उमेदीने शाळेसाठी घराबाहेर पडत आहेत. अशात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची मोठी पंचायत होत आहे. मिळेल त्या वाहनाने, मिळेल तेथे बसून, एखादवेळी लटकून ते घर ते शाळा आणि शाळा ते घर असा प्रवास करीत आहेत. वाहनचालकही मुलांना टॉपवर बसून वाहतूक करीत आहेत. ऑटो असो की जीप, ग्रामीण भागात हमखास हे चित्र नजरेस पडत आहे. एसटी नसल्याने मुलांचा नाविलाज होत आहे. ग्रामीण भागात संपामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांची चांदी होत असून त्यांच्याकडून अव्वाच्यासव्वा दरही आकारला जात असल्याचे सांगितले जात आहे.

पालकवर्ग चिंताग्रस्त

संपावर एसटी कर्मचारी ठाम असल्याने संप कधी मिटेल याची शास्वती देता येत नाही. दिवाळी सारख्या महत्वाच्या सणात सुद्धा संप होता. यामुळे अनेकांना याचा फटका बसला. खासगी बसेस आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनातुन प्रवाशांना प्रवास करावा लागला. आता हा संप शालेय विद्यार्थ्यांच्या मुळावर आला आहे. एसटी बंद असल्याने त्यांना चक्क जीव मुठीत धरून मिळेल त्या वाहनाने प्रवास करून शाळेला जावे लागत असल्याने मुलांच्या भविष्याला घेऊन पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT