crime News  sakal
नांदेड

Crime News : गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक गावठी पिस्टल, २ रिकाम्या मॅग्झीनची विक्री करताना एकास अटक केली आहे. राधेशाम पंजाबराव भालेराव असे अटक आरोपीचे नाव आहे.

सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे व अंमलदारांना सोमवारी (ता.१०) कापूस संशोधन केंद्रासमोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण गावठी पिस्टल बाळगून असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

ही माहिती वरिष्ठांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपी राधेशाम पंजाबराव भालेराव, (वय २४, व्यवसाय मजूरी, रा. सखोजीनगर, नांदेड) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व २ रिकाम्या मॅग्झीन असा एकूण ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पथकातील पोलीस उपनिरीक्षक हरजिंदरसिंघ चावल, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश दासरवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी तेलंग, साहेबराव कदम, तानाजी येळगे, अनिल बिरादार, मोतीराम पवार, राजीव बोधगिरे, अकबर पठाण, इसराइल शेख, गजानन बयनवाड यांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai police Transfer: अखेर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने कानउघाडणी केल्यानंतर जाग

Navratri 2024 : आज तिसरी माळ, जाणून घ्या, चंद्रघटा मातेची पूजा विधी अन् संपूर्ण कथा

अग्रलेख : चार भिंतीतील समानता

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2024

हौस ऑफ बांबू : अभिजाताचे श्रेय कुणाला..?

SCROLL FOR NEXT