नांदेड : लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण करमणुकीसाठी काही ना काही छंद जोपासतांना आपण पाहत आहोत. पण नांदेड मधील प्रसाद शिंदे या आवलियाचा छंद काहीसा वेगळा आहे. जो निसर्ग आणि जनतेची सेवा अश्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारा आहे. नांदेडच्या या प्राणीमित्राने संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात तब्बल ५७ सापांना मानवी वस्तीमधुन पकडुन परत निसर्गाच्या सानिध्यात अगदी सुरक्षीत व सुखरूप सोडले आहे.
लॉकडाऊनच्या काळात मानवी हस्तक्षेप नसल्या कारणांने पक्षी, प्राणी यांचा अगदी मुक्त विहार सुरु आहे. अश्या कालावधीत साप आणि इतर प्राणीही शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. ता. २२ मार्चपासुन लागू झालेल्या लॉकडाऊन व संचारबंदीपासून शहर व परिसरात आढळलेल्या ५७ विषारी- बिनविषारी सापांचा वावर आढळुन आला आहे.
हेही वाचा - Nanded Breaking : गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील २० कर्मचारी पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २६
हेल्पिंग हॅण्ड्स वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचा पुढाकार
यासाठी शहरात वन्यजीव संरक्षणासाठी कायमच तत्पर असलेल्या हेल्पिंग हॅण्ड्स वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद प्रल्हादराव शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळातही तिच तत्परता दाखवत शहरातील विविध भागात मानवी वस्तीमध्ये आलेले ५७ साप पकडले आहेत. त्यात घोणस, नाग व पोवळ्या विषारी सापांसह धामण, डुरक्या घोणस, कुकरी, तस्कर, पाणदिवड, धुलनागीन या विनविषारी सापांचा समावेश देखील आहे.
बिबट आई व तिच्या पिलाची भेट घडवून आणली
सापांबरोबरच ता. १८ एप्रिल रोजी भोकर तालुक्यातील भोसी भागात ज्वारीच्या शेतात आईपासुन दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाची सुद्धा भेट घडून आण्यासाठी प्रसाद शिंदे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले या कामी त्यांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक देखील होत आहे. त्याचबरोबर शहरातील स्नेहनगर भागात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात उच्छाद घालत असलेल्या एका वानरास प्रसाद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी शिताफीने पकडुन परत जंगलात सोडले आहे.
येथे क्लिक करा - मुळ गावी जाण्यासाठी माहिती ऑनलाईन भरा- जिल्हाधिकारी
साप हा माणसाचा मित्र असल्याने त्याला मारु नका
“ सध्या कोरोना विषाणुमूळे जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावशक सेवा वगळता बाकी सर्व काही ठप्प आहे. पण या काळात शहरातील नागरिकांच्या घरात साप निघाल्यास त्यास न मारता सुरक्षितस्थळी सोडण्यास नागरिकांची ईच्छा असते, पण भीतीपोटी साप मारले जातात. अशावेळी माझ्याशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले आहे. मलाआपण कोणत्याही वेळी बोलावल्यास मी साप वाचवण्याचे काम नक्कीच करील कारण मागील अकरा वर्षांपासून हे काम करत आहे.”
-प्रसाद शिंदे, सर्पमित्र, नांंदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.