lpg gas lpg gas
नांदेड

गृहिणींच्या चिंतेत वाढ; घरगुती गॅस पुन्हा महागला

वास्तविक पाहता ग्रामीण महिलांना चुलीचा त्रास होऊ नये, त्यांचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजनेतून ग्रामीण भागात फुकट गॅस दिले.

प्रमोद चौधरी

नांदेड: आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. त्यातच केंद्र शासनाने गुरुवारी (ता. एक जुलै) पुन्हा घरगुती सिलेंडरमध्ये २५ रुपये ५० पैशांची वाढ केली. कोरोनामुळे अगोदरच घराचे बजेट बिघडले असताना आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केल्याने सर्वसामान्यांनी जगायचे की मरायचे, हेच कळत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना दिल्या.

वास्तविक पाहता ग्रामीण महिलांना चुलीचा त्रास होऊ नये, त्यांचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजनेतून ग्रामीण भागात फुकट गॅस दिले. परंतु, आता हेच फुकट गॅस ग्रामीण भागातील महिलांच्या मुळावर उठले आहेत. परिणामी उज्वला गॅस योजनेचा हेतू धुळीस मिळत आहे. ग्रामीण भागात चुलीसाठी सरपण तुराट्या, गोवऱ्या सहज उपलब्ध होत असल्याने गॅस पेटवण्यापेक्षा चूल पेटवण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे नंदिनी महिला ग्रुपच्या अध्यक्षा कांताबाई पाखरे, सुजाता पवार यांनी सांगितले.

या वर्षात झालेली वाढ
फेब्रुवारी २०२१ मध्ये ७५ रुपयांची वाढ झाल्याने गॅसची किंमत ७९५ होती. मार्चमध्ये पुन्हा ५० रुपयांची वाढ केल्याने गॅसची किंमत ८४५ इतकी झाली. एप्रिलमध्ये १० रुपये कमी केल्याने गॅसचे दर ८३५ इतके झाले. आता जुलैमध्ये पुन्हा २५ रुपये ५० पैसे इतकी वाढ केल्याने गॅसची किंमत ८६०.५० पैसे इतकी झाली आहे.

कुटुंबप्रमुखाच्याही चिंतेत वाढ
कोरोना संकटामुळे अनेकांचे वेतन रखडले. कोणाचे कमी झाले. अनेकांचा रोजगार हिरावला तर काहींचे उद्योगधंदे बुडाले. अशा लोकांकडे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुणी उधार उसनवार घेऊन तर कुणी शिल्लक असलेल्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वर्षांपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे. त्यामुळे असे कुटुंब अगोदरच खर्चात काटकसर करून आपल्या संसाराचा गाडा कसेबसे पुढे ढकलत आहेत.

महिला म्हणतात...
पेट्रोल-डिझेल वाढल्याने महागाईचा आगडोंब उठला आहे. त्यातच केंद्र शासनाने गॅसच्या दरातही २५ रुपये ५० पैशांची वाढ केली. वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणीलाही सहन करावे लागणार आहे. एकंदरीतच महागाईच्या आगडोंबमध्ये सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे.
- ज्योती सोनटक्के, ओंकारेश्वरनगर, नांदेड.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेतून ग्रामीण भागात घरोघरी फुकट गॅस कनेक्शन दिले. परंतु, गॅसचे दर वाढत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी ग्रामीण महिलेला कोरोनाच्या महामारीत पुन्हा धुराशी सामना करावा लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- भागीरथी बच्चेवार, सिडको, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT