मालेगाव ता. अर्धापूर वृक्षारोपन 
नांदेड

हरित जीवनशैलीचा मालेगावकरांचा ध्यास; पर्यावरण समृद्धीसाठी कटीबद्ध

पशु चिकित्सालय, प्राथमीक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी तसेच पेट्रोलपंप परिसरात वृक्षारोपणास गावकर्‍यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अमोल जोगदंड

मालेगाव (जिल्हा नांदेड) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मालेगाव (ता. अर्धापूर) येथील विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहिमेस भरघोस प्रतिसाद देत नागरिकांनी पर्यावरण समृद्धीसाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प केला.

ग्रामपंचायत मालेगाव व वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने एक व्यक्ती-एक झाड या योजने अंतर्गत वृक्ष दत्तक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रणेते संतोष मुगटकर, जलतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक डाॅ.परमेश्वर पौळ, स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक डाॅ.प्रीतम भराडिया, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी तसेच वृक्षमित्र सचिन जोड यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - नांदेडमध्ये वर्षभरात सात हजारपेक्षा अधिक रुग्णांचे सिटीस्कॅन

वृक्षदत्तक योजनेसाठी मालेगावातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा वाढता प्रतिसाद समाधानकारक असून निसर्गाशी तुटत चाललेला संवाद पुन्हा दृढ करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्षारोपणाचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनी केले. डाॅ.प्रीतम भराडिया यांनी आधुनिक ज्ञानाच्या माध्यमातून वृक्षचळवळ व्यापक करण्यासाठी लागणारी तांत्रिक मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. जलतज्ज्ञ डाॅ.परमेश्वर पौळ यांनी भरपूर सिंचन सुविधा असलेला मालेगावचा परिसर हरित चळवळीच्या वाढीसाठी पोषक असल्याचा निर्वाळा दिला.

सरपंच अनिल इंगोले यांनी वृक्षमित्र परिवाराने सुचविलेला घनवन प्रकल्प राबविण्यासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात प्रा. बसवेश्वर राजेवार व मारोतराव सोमवारे यांना वृक्ष दत्तक योजनेखाली वृक्षाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृक्षमित्र जितेंद्र राजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी संजय निलमवार यांनी केले. उपसरपंच मनोहर खंदारे, सर्व सदस्य, सतीष कुलकर्णी, ईश्वर पाटील, बळवंत इंगोले, प्रा. श्रीहरी खुर्दामोजे, अशोक स्वामी, डाॅ.जीवन जोशी, शिवराम पांचाळ, पत्रकार सुभाषिस कामेवार, रामेश्वर वारले, केशव हनमंते, तुषार वाघमारे, संगीता कोल्हे, शेषेराव राजेवार यांच्यासह असंख्य पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

येथे क्लिक करा- सेलूचे सामाजिक वनीकरण चालते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवावर

पशुचिकित्सालय व स्मशानभूमीत वृक्षांची लागवड करण्यात आली

सार्वजनिक स्मशानभूमिचा परिसर निसर्गरम्य करण्याचा प्रकल्प ओमशांती आॅर्गनिक फार्मर गटाने हाती घेतला असून जागतिक पर्यावरणदिनी या प्रकल्पाचा शुभारंभ ब्रम्हकुमारी स्वातीबहेन यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आला. ओमशांती आॅरगॅनिक फार्मर गटाचे प्रमुख भगवानभाई यांनी स्मशानभूमिच्या नियोजनबद्ध विकास प्रकल्पाची माहिती देत हे एक निसर्गरम्य स्थळ ठरावे असा मानस व्यक्त केला. स्वातीबहेन यांनी स्मशानभूमिचा विकास करण्याच्या कल्पकतेचे स्वागत करुन सध्याच्या काळात पर्यावरणसमृद्धीची आवश्यकता प्रतिपादीत केली. या कार्यक्रमासाठी बालाजी सावंत, भाऊराव पाटील, सत्यनारायण मंत्री, अमोल जोगदंड यांच्यासह आदीनी मोलाचे परिश्रम घेतले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT