नांदेडच्या बांधकाम विभागात मोठा गैरव्यवहार sakal
नांदेड

नांदेडच्या बांधकाम विभागात मोठा गैरव्यवहार

अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक कामांत गैरव्यवहार होत आहे. तीन वर्षांपूर्वी बोगस डांबर चलनाद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही केवळ कंपनीचे नाव बदलून त्याच व्यक्तींना कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. अशा कामांद्वारे या विभागातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

कथित डांबर गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) जबाब नोंदवण्यासाठी बंब सोमवारी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर गैरव्यवहार प्रकरणी सततच्या तक्रारींमुळे संबंधित कंपनीच्या काही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संबंधितांकडून काम काढून घेण्यात आले. मात्र, एका रात्रीत दुसरी कंपनी स्थापन करून जी. जी. कन्स्ट्रक्शनची गार्गी अॅन्ड गार्गी या नावाने कंपनी स्थापन करून पूर्वीच्या कंपनीतील सर्व कार्यकारिणी (बॉडी) या कंपनीत घेण्यात आली. त्यांनाच पूर्वी ३२ कोटीला दिलेले टेंडर आठ दिवसांनी ३८ कोटींना देण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर तक्रार केली होती.

या प्रकरणाची एसीबी, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही, पुरावे देऊनही तीन वर्षापासून चौकशीही करण्यात आली नाही. पाच - सहा वर्षांपासून केलेल्या तक्रारीवर मंत्री उत्तर देत नसतील तर लोकांचा पैसा त्यांना लुटू देणार नाही. विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांवरही कुठलीच कारवाई होत नाही. अखेर याबाबत ‘एसीबी’कडे दाखल झालेल्या तक्रारीत जबाब देण्यासाठी अधिकाऱ्यांनी बोलाविले होते. त्यासाठी येथे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम विभागात प्रचंड गैरव्यवहार होत आहे. चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील शंभर मीटरचा एखादा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आमदारकी तर सोडेनच पण आयुष्यात पुन्हा राजकारणही करणार नाही.

- प्रशांत बंब, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT