Viral Video Sakal
नांदेड

Viral Video : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसाने मराठा आंदोलकाच्या पायावरून घातली गाडी | Maratha Reservation

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे शनिवारी धर्माबाद येथे आले होते.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यातील पोलिसाने आंदोलकाच्या पायावरून गाडीचे चाक घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे शनिवारी गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते.

"मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना तुम्ही सभा का घेता?" असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर 'मी मराठ्यांचा निषेध व्यक्त करतो' असं वक्तव्य चव्हाणांनी केल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या समोरच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. त्यानंतर चव्हाणांचा ताफा जात असताना ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

आंदोलकानी अशोक चव्हाणांना घेराव घातल्यानंतर त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तर ताफा जात असताना पोलिसांच्या एका गाडीचे चाक आंदोलकाच्या पायावरून गेल्याची घटना घडली. एका आंदोलकाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

"समाजाचा घटक म्हणून प्रश्न केलाय याचा राग आला म्हणून अंगावर गाडी घालून पुढं गेला. घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद गावातील आहे असं सांगण्यात येतंय. नेमकं हा आरक्षणाचा विषय आहे का आणखी कशाचा सांगता येणार नाही पण नांदेडच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या व्हिडिओतील घटना आरक्षणामुळे झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. काळे झेंडे दाखवताना आंदोलन कर्त्याच्या पायावर गाडी घातलेली ही घटना गंभीर आहे. ही घटना विचार करायला लावणारी आहे." अशी पोस्ट रामनाथ खोड यांनी केली आहे. त्याचबरोबर घटनेचा व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT