Marotrao Kawale Guruji sakal
नांदेड

Marotrao Kawale Guruji : सत्याच्या लढाईत नातीगोती जपायची नसतात , तिकीट दिल्यास निवडणूक लढविणार : मारोतराव कवळे गुरुजी

Marotrao Kawale Guruji : मारोतराव कवळे गुरुजी यांनी भाजपकडून तिकीट मिळाल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. शेती आणि सिंचनाच्या विकासावर भर देण्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नायगाव विधानसभा मतदार संघातून आपण भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आपल्याला भाजपने तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढविणार असल्याची भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा भाजप नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी घेतली.

शेवटी राजकारणात नातीगोती याला काही महत्त्व नाही. म्हणून तर सत्तेसाठी महाभारत घडल्याचे सूतोवाच कवळे गुरुजी यांनी करत एका दगडात अनेकपक्षी मारले. ‘सकाळ’च्या ‘थेट-भेट’ उपक्रमात सोमवारी (ता.३० सप्टेंबर) उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी बोलत होते. ते म्हणाले, कृषी प्रधान देश आहे. त्यासाठी काम होणे आवश्यक आहे.

विद्यमान आमदारांनी रस्ते, नाली व समाज मंदिरावर काम केले. पण, एका गोष्टीवर काम करून चालणार नाही. सगळ्यात प्राधान्य सिंचन व दुसरे शेतीला जोडणारे रस्ते, वीजेला दिले पाहिजे. कारण ग्रामीण भागाचे उत्पन्न हे शेतीवर आधारित आहे. शेतीकडेच आपले दुर्लक्ष झाले, तर मग कसे होणार? शेतकरी आत्महत्या कशा थांबवणार? आज आमच्याच मतदारसंघात नाही तर, मराठवाडा आणि विदर्भात रोज आत्महत्या होत आहेत.

याचे कारणच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. हे जर आपण व्यवस्थ‍ित केले तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपलीही कमतरता विकसित करून पुढे नेली पाहिजे. आमच्याकडे पद, सत्ता, पैसा नसतानाही नांदेड जिल्ह्यात एवढे मोठे काम उभे केले. साडेचार हजार हातांना रोजगार निर्माण करून द‍िला. आज शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढ संदर्भात आम्ही नियोजन केले. आमच्या भागातील तरून वर्ग आत्मविश्चासाने शेती करून प्रचंड उत्पादन करत आहे. याला सत्तेची जोड झाली तर, निश्चित या भागाला खूप पुढे नेता येऊ शकते.

''सकाळ'' माध्यम व ''ॲग्रोवन'' हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहे. बातम्या, सदर, लेख यातून प्रेरित होऊन शेतीकडे वळत आहोत. शेतीला आपल्या भागात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. शेतीमध्ये मोठी ताकद आहे. पण, इथल्या तरुणांना मार्गदर्शन करणारे नेतृत्व हवं. दरवर्षी नांदेड जिल्ह्यात साडे दहाशे ते अकराशे मिलिमीटर पाऊस पडतो.

आमच्या किनवट, माहूर भागात बाराशे मिलिमीटर पाऊस पडतो. पाणी कुठे कमी आहे. इजराईलसारख्या देशात साडेतीनशे मिलिमीटर पाऊस पडतो. तिथे पाणी कमी नसते. इथे तीनपट पाणी जास्त आहे. आपल्याकडे न‍ियोजन नाही. प्लॅनिंग नाही, आपल्याला प्लॅनर व्हायचे आहे, असे कवळे गुरुजींनी सांगितले.

विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी सक्षम

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येताना कोणताही शब्द दिला नाही. त्यांच्याकडे मी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढविण्याची भूमिका मांडली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी सक्षम आहे. पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले तर लढविणार. नाही दिल्यास आहे त्या कामाकडे लक्ष देणार. अशोकराव चव्हाण यांना नेता मानतो. नेत्याचा जो आदेश असतो तो आपण शिरोधार्य मानून काम करणार, असे कवळे गुरुजींनी सांगितले.

सहनुभूतीला नाही, विकासाला महत्त्व

लोकसभेला खूप मोठी संधी आहे. केंद्रात सत्ता आहे. येथील जनता हुशार आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून देऊन भाजपचे सरकार असल्याने येथे काही फायदा होणार नाही. काही लोकांना वाटते सहानुभूतीचा विषय, पण असे काही नाही. लोक कामांना, विकासाला महत्त्व देतात. माझ्या नावाने कोणी ओळखत नाही. पण, कवळे गुरुजी म्हणून मला ओळखतात.

अशोक चव्हाण अचानक भाजपात गेल्याने पराभव

नांदेड लोकसभेत भाजपचा पराभव होत नव्हता. अशोक चव्हाण अचानकपणे भाजपमध्ये गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. सगळ्यांना वाटले जिल्हा एका बाजूला गेला आहे. आता काय करायचे? विरोधात कोणी राहिले नाही, अशी मानसिकता झाली. त्यामुळे कोणी असे काम केले नाही. लोकांना कोणी समजावून सांगितले नाही. त्यामुळे लोकसभेला फटका बसला, असे कवळे गुरुजी म्हणाले.

आरक्षणाचा प्रश्न सुटेल

मराठा आरक्षणाची मराठवाड्याला सर्वात मोठी गरज आहे, तो प्रश्न ज्वलंत आहे. त्या प्रश्नाला आचारसंहितेपूर्वी निजाम गॅझेट लागू होऊ शकते. तो जर प्रश्न सुटला तर बऱ्यापैकी वातावरण स्थिर होऊ शकते, असा विश्वास कवळे गुरुजींनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT