नांदेड : पावणेसहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त sakal
नांदेड

नांदेड : पावणेसहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वजिराबाद डी.बी. पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने चोरट्यांकडून दोन दुचाकीसह दोन ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघड करून पाच लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई ता.२५ नोव्हेंबर रोजी झाली.

शहर व जिल्ह्यात होत असलेल्या चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक फरारी आरोपींचा शोध घेत होते.

या वेळी त्यांनी आरोपी सुधीर तातेराव तरटे (रा. वडगाव, ता.कळमनुरी) याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देवून एक पॅशन प्रो आणि एक शाईन अशा ८० हजार रुपयांच्या दोन दुचाकी काढून दिल्या.

तसेच संशईतरित्या मिळून आलेला आरोपी तुकाराम उर्फ बबलु लक्ष्मण पवार (रा. चिंचोरडी, ता.कळमनुरी) यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता दिपक उर्फ छक्या विनोद भोकरे (रा. जुना कौठा) व सुधीर तातेराव तरटे (रा. वडगाव, ता.कळमनुरी) यांच्या मदतीने पोलिस ठाणे आखाडा बाळापूर व कुरुंदा हद्दत दोन ट्रॅक्टर हेड चोरी केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT