नांदेड : शहरात महावितरणची वीज देयक वसुली सुरु आहे. या मोहिमे अंतर्गत सोमवारी ( ता. 21 ) अर्धापूर शहरात अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वीज बील वसूल करण्यास गेलेल्या अर्धापूर शाखा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी गेले असता वीजबील न भरल्यामुळे खंडीत केलेला वीजपुरवठा सुरु आहे की नाही याची खात्री करत असताना वीजग्राहकाच्या मुलाने बाचाबाची करत कामात अडथळा निर्माण केला. त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांसोबतही उध्दटपणाकरत मी तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी शिवीगाळ करणारे किशोर बाळासाहेब देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने गुन्हा दाखल होताच ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो अशा धमक्याही अधिकाऱ्यास दिल्या आहेत.
सोमवारी ( ता. 21 ) दुपारी फुलेनगर अर्धापूर येथे थकीत वीज देयक वसूली व तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केलेला वीजपुरवठा तपासणी करत असताना एक लाख 30 हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा खंडीत केलेल्या मीटरची तपासणी करताना थकबाकीदार वीजग्राहक बाळासाहेब बाबासाहेब देशमूख यांचा मुलगा किशोर देशमूख याने कर्तव्यावर उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता सय्यद सादतउल्ला महेबूब कादरी व त्यांचे सहकारी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली एवढेच नाही तर त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली.
हेही वाचा - एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर काँग्रेसने दावा केला आहे.
तसेच तुम्हा सर्वांना मी बघून घेतो अशी धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्याचबरोबर आपल्यावर महावितरणच्या वतीने गुन्हा दाखल झाला आहे असे समजताच ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करतो अशा धमक्याही अधिकाऱ्यास दिल्या आहेत. अशा प्रवृत्तीस पोलीसांनी वेळीच आळा घालावा जेणे करुन फ्रंटलाईन वर्कर असलेल्या कर्मचारी वीजेसारख्या जीवनावश्यक बाबीचा पुरवठा करत असताना डगमगणार नाहीत अशी चर्चा महावितरणचे कर्मचारी करत आहेत.
झाल्या प्रकाराबाबत अर्धापूर पोलिस ठाण्यात बाचाबाची करत धमकी देणाऱ्या किशोर बाळासाहेब देशमूख याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून धमकी दिल्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 353 आणि 506 अन्वये अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.