नांदेड - कुठलीही वाईट घटना किंवा वेळ सांगून येत नाही. त्यामुळे एखादी घटना घडून त्यात जीवीतहानी होऊ नये, यासाठी सजग राहणे आणि उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र, असे असले तरी महावितरणचे कार्यालय मात्र अग्निरोधक यंत्र देखभाल दुरुस्तीविषयी फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. महावितरणाच्या मुख्य कार्यालय व महावितरणच्या ग्रामीण कार्यालयात आगरोधक यंत्रांची वाणवाच असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहेत. यातील बहुतेक घटना ह्या शार्टसर्किटमुळे झाल्याचे पुढे आले आहे. महावितरणाचे विभागीय कार्यालय असलेल्या आण्णा भाऊ साठे चौकातील मुख्य कार्यालय व तरोडा नाका परिसरातील महावितरणाच्या ग्रामीण कार्यालयात मिळून केवळ आठ ते दहा अग्निशमन यंत्र बसविण्यात आले आहेत. हेही वाचा- नांदेड तालुक्यात ३७ महिलांना मिळणार सरपंचपदाचा मान तीन अग्निरोधक यंत्र कार्यालयातील डीपीजवळील कचरा कुंडीत विशेष म्हणजे तरोडा नाक्यावरील कार्यालयात केवळ एक ते दोन अग्निरोधक यंत्र असल्याने अभ्यांगताकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. विभागीय कार्यालयात अग्निरोधक यंत्रांकडे दुलक्ष होत असेल तर विभागातील इतर ठिकाणच्या कार्यालयाची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आण्णा भाऊ साठे चौकातील महावितरणच्या विभागीय कार्यालयातर्फे नांदेडसह, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा कारभार याच दुमजली इमारतीमधून चालतो. या दुमजली इमारतीच्या पहिल्या माळ्यावर केवळ पाच ते सहा अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत तर तीन अग्निरोधक यंत्र कार्यालयातील डीपीजवळील कचरा कुंडीत धुळीने माखून गंजून गेल्याचे दिसून येते. हेही वाचा- रोहित शर्मा, धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी! पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा बोटावर मोजण्याइतके अग्निरोधक यंत्र तरोडा नाका परिसरातील महावितरणाच्या ग्रामीण कार्यालयात नवीन मिटर, वायर, विजेच्या तारा, सिंगल व डबल फेज डीपी व नवीन कनेक्शनसाठी लागणारे साहित्य याच इमारतीमधुन जिल्हाभरात पुरवठा केले जाते. असे असताना देखील इमारतीमध्ये केवळ बोटावर मोजण्याइतके अग्निरोधक यंत्र असल्याचे दिसून येत आहे. याच इमारतीमध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा उघड्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे महावितरणाचे विभागीय कार्यालय आगीच्या घटना घडू नये, यासाठी किती गंभीर असल्याचे यावरुन दिसून येते. जुनी इमारत आगरोधक करणे सध्या तरी शक्य नाही महावितरण कार्यालयाची इमारत जुनी आहे. त्यामुळे आगरोधक इमारत करणे सध्या तरी शक्य नाही. अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयात अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. - दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ. |