वीज चोरी अर्धापूर तालुक्यातील उमरी  
नांदेड

महावितरणची मोहीम: आकोडे टाकत वीजचोरणाऱ्या 26 आकोडेबहाद्दरांवर कारवाई

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा त्याचबरोबर अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने मोहीम राबवली जात आहे. गेल्या आठवडयात केलेल्या कारवाईत अर्धापूर तालूक्यातील उमरी येथे आकडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरुन वापरणाऱ्या 26 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. वीजकायदा 2003 अन्वये कलम 135 नुसार कारवाई करत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा त्याचबरोबर अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता मोहन गोपूलवाड आणि ग्रामीण विभगाचे कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांच्या सुचनेनुसार ग्राणीण विभागाअंतर्गत वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एस. कादरी, कनिष्ठ अभियंता मोहमम्द रहेमान, प्रधान तंत्रज्ञ जी. पी. इंगोले तसेच तंत्रज्ञ बी. एस. ढवळे यांच्या पथकाने वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर मागच्या आठवडयात आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून उमरी गावातील 26 आकोडे बहाद्दर वीजचोरांवरती कारवाई करत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा - भारतात हजारो वर्षापासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणात मागासलेल्या समाजातील मुलां- मुलींसाठी शाळा काढल्या.

आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही कलम 126 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वाहिनीमध्ये छेडछाड करणे अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम 135, 138 नुसार कारवाई करण्यात येते. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवून संबंधितांना अटकही होवू शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT