याबाबत आईच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
निमटेक (नांदेड): येथे नेत्याचे बॅनर लावण्याच्या कारणावरून सहा जणांनी गावातील युवकास बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. १२) मृत्यू झाला आहे. याबाबत आईच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, निमटेक येथील महेश सुरेशराव पाटील (वय २९) हा ता. नऊ आॅगस्ट रोजी शेताकडून गावाकडे येत होता. त्यावेळी खुशाल मोहनराव पाटील, आदित्य खुशाल पाटील, सुनीता खुशाल पाटील, त्र्यंबक माधवराव पाटील, शैलेश त्र्यंबक पाटील, मारुती उर्फ मनोज अशोक पाटील या सहा जणांनी महेश पाटील याला घरी बोलावून ठार मारण्याच्या उद्देशाने पकडून ठेवले.
यावेळी एका आरोपीने महेशच्या डोक्यात बॅटने मारून गंभीर जखमी केले तर सोबतच्या इतर आरोपींनी लाथा-बुक्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत सदर तरुण जखमी झाल्याने त्यास उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपस्थित डॉक्टरांनी सदर युवक कोमात गेल्याने उपचारासाठी नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, नातेवाईकांनी त्याला निजामाबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.
या प्रकरणी युवकाची आई कलावती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी उमरीला भेट दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे तपास करत आहेत. सध्या गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.