नांदेड : सहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्याला ‘कोरोना’ रुग्णाचे धक्क्यावर धक्के बसत आहेत. शनिवारी (ता.तीन) सकाळी तीघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी पुन्हा त्यात दोनची भर पडली. त्यामुळे आता ‘कोरोना’ बाधितांची संख्या ३१ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
शुक्रवार (ता. एक मे) तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी तीन नमुने रविवारी (ता. तीन मे) Corona Positive आल्याने नांदेडकरांना धक्काच बसला. रविवारी सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी दोन रुग्ण पंजाब येथून आलेले होते. तर एक महिला ही शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’आजारावर उपचार घेत होती. त्यात पुन्हा दुपारी दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना बाधितांची संख्या ३१ वर पोहचली.
‘सारी’ आजारावर सुरु होते उपचार
रविवारी (ता.तीन मे) सकाळी तीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले. त्यामध्ये देगलुरनाका परीसरातील रहिमतनगर येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश होता. ही महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार घेत होती. दरम्यान या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी सकाळी तिला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दुपारी तिला पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या महिलेचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
दुपारपर्यंतची परिस्थिती
महापालिका हद्दीतल्या एक हजार १९९ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी रविवारी दुपारपर्यंत एक हजार १२२ स्वॅबचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर २२ स्वॅबचा अहवाल अजूनही प्रंलंबित आहे. तर १८ संशयितांचे स्वॅबचे निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे एकुण घेण्यात आलेल्या एक हजार १९९ स्वॅब पैकी ३१ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.