Nanded Assembly Election sakal
नांदेड

Nanded Assembly Election : पुन्हा होणार जोरदार लढत...यंदा आणखी चुरस वाढण्याची शक्यता

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून झालेल्या तीनही निवडणुका या चुरशीच्या आणि रंगतदार झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवीन नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून झालेल्या तीनही निवडणुका या चुरशीच्या आणि रंगतदार झाल्या आहेत. आता आगामी २०२४ मध्ये देखील विधानसभेची निवडणुक पुन्हा जोरदार आणि चुरशीची होणार आहे. तसा हा मतदारसंघ हा शिवसेना - भाजपचा होता परंतू मागील वेळेस या ठिकाणी पुन्हा कॉँग्रेसने यश मिळवले आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे भास्कराव पाटील खतगावकर खासदार झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिणमधून कॉँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा आमदार झाले. २०१४ मध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही कॉँग्रेसचे अशोक चव्हाण खासदार झाले.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील आमदार आले. त्यावेळी त्यांनी भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांचा थोडक्यात पराभव केला. त्यामुळे दिलीप कंदकुर्ते यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. या निवडणुकीत कॉँग्रेसची व्होट बँक मोठ्या प्रमाणात फुटली होती. या निवडणुकीत एमआयएमने जोरदार लढत दिली होती. भाजपचे दिलीप कंद्कुर्ते यांनी शिवसेनेला लढत देत दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाले आणि त्यांनी कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिणमध्ये जोरदार लढत झाली त्यात काँग्रेसचे मोहन हंबर्डे हे निवडून आले. काँग्रेसला नवा चेहरा यावेळी मिळाला.

शांत, सरळ स्वभाव म्हणून परिचित असलेले हंबर्डे यांचा काँग्रेसला फायदा झाला व या वेळेसही दिलीप कंदकुर्ते यांना पराभव पत्करावा लागला. भाजप आणि शिवसेनेतील छुप्या संघर्षामुळे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या निवडणुकीत तिसरे स्थान मिळाले होते. यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार लढत दिली.

दरम्यान, आता गेल्या वर्षभरात सर्वच राजकीय समीकरण बदलले असून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे सोबत असल्याने चित्र वेगळे निर्माण होईल, अशी शक्यता आहे.

अनेकजण इच्छुक...

यंदाही इच्छुकांची मांदियाळी राहणार..नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे निर्णय घेतील. ते स्वतः विधानसभेला राहू शकतात किंवा राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.

त्याचबरोबर त्यांचे निकटवर्तीय जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांनाही उमेदवारी मिळू शकते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपसाठी कोणाला पुढे करतील? हे सध्या सांगणे कठीण असले तरी दिलीप कंदकुर्ते हे परत एकदा नशीब आजमावू शकतात तर काँग्रेसकडून मोहन हंबर्डे हे विधानसभेसाठी असू शकतात. त्याचबरोबर एमआयएम पक्षातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे कोण राहणार? हे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT