Bhaurao Corporate Sugar Factory Election  
नांदेड

Nanded : भाऊराव कारखान्याची निवडणूक बिनविरोध

कार्यकर्त्यांचा जल्लोष; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योग समूह असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत सहा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून विद्यमान संचालक माजी आमदार अमिता चव्हाण, प्रवीण देशमुख, भिमराव कल्याणे, रंगराव पाटील इंगोले, रामराव कदम यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

कारखान्याच्या २१ जागांसाठी ६४ उमेदवारांचे उमेदवारी वैध ठरले होते. या निवडणुकीत जिल्ह्यातील कॉँग्रेस विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अंग काढून घेतले होते तर शिवसेनेच्या काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ही निवडणूक बिनविरोध होईल अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती आणि झाले तसेच.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमर राजूरकर, अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, बाळासाहेब देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून सुनिल गनलेवार, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, एम. डी. मुळे, माधव बोकारे यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार

लक्ष्मीनगर ऊस उत्पादक गट ः गणपतराव तिडके, अॅड. सुभाषराव कल्याणकर, व्यंकटी साखरे, बारड ऊस उत्पादक गट ः शिवाजीराव पवार, कैलास दाड, व्यंकटराव कल्याणकर, मालेगाव ऊस उत्पादक गट ः मोतीराम जगताप, लालजी कदम, बळवंत इंगोले, मुदखेड ऊस

उत्पादक गट ः माधवराव शिंदे, बालाजी शिंदे, किशनराव पाटील, आमदुरा ऊस उत्पादक गट ः दत्तराव आवातिरक, अशोक कदम, माधवराव कल्याणे, संस्था मतदार संघातून नरेंद्र चव्हाण, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : आनंद सावते, महिला प्रवर्ग ः कमलबाई सुर्यवंशी, मीरा पाटील, ओबीसी प्रवर्ग ः सुभाषराव देशमुख, भटके विमुक्त ः साहेबराव राठोड.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध झाल्याचा मनःस्वी आनंद असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व उमेदवारांचेही आभार. भाऊराव कारखान्याचे नवीन संचालक मंडळ नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करेल आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासात व सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT