Nanded Bhokar market Committee roof work Completed 
नांदेड

Nanded : भोकर बाजार समितीच्या शेडचे काम पूर्ण

दिड कोटी रुपयांचा निधी खर्च : शेतकऱ्यांचा माल सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

भोकर : येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन विविध विधायक कामांना प्राधान्य दिले आहे. आता नव्याने शेतीमाल सूरक्षीत असावा म्हणून बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुमारे (एक कोटी ६४ लाख) रुपये खर्च करून भव्य लिलाव शेड उभारण्यात आला आहे. अशी माहिती सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पंचक्रोशीतील आणि लगतच्या तेलंगणा राज्यातून मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांचा मालाची आवक आहे. मालाला योग्य भाव दिला जातो. त्यातून बाजार समितीला चांगले उत्पन्नही झाले होते. समितीच्या वतीने (१८० व्यापारी गाळे) व चकचकीत रस्ते, पिण्याचे फिल्टर पाणी, मुताऱ्या, शौचालय, ऑनलाइन पद्धतीने मालाची नोंदणी, रोखीने व्यवहार अशी कामे इथे होत असून मराठवाड्यातील सुसज्ज भव्य तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. दिवसेंदिवस समिती ही विकासाकडे झेपावते आहे.

शेतीमालाला मिळाले सुरक्षा कवच :

तालुक्यातील बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने मालाची मोठ्या प्रमाणात आवक-जावक होत आहे. शेतकऱ्यांचा माल सुरक्षीत ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हती परिणामी पावसाळ्यात मालाचे नुकसान होत असे. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापारी वर्गातून लिलाव शेडची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन सदरील प्रश्न मार्गी लावला नव्हे तर चव्हाणांच्या हस्ते वर्षभरापूर्वी भूमिपूजनही करण्यात आले होते. आता त्या कामाला गती मिळाल्याने (१००/१५०) आकाराचा लिलाव शेड पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे.

लवकरच या शेडचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती जगदीश पाटील भोसीकर सचिव पी.जी. पुजेकर यांनी दिली. भोकर बाजार समितीला डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नाव दिले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे निर्णय असतील त्याला त्यांनी आज पर्यंत खो दिला आहे.

आम्ही त्यांच्या आदेशानुसार काम करीत आहोत. लीलाव शेड हा बाजार समितीच्या उत्पन्नातूनच उभारला जात आहे. विरोधकांनी पत्रकबाजी करून अशोक चव्हाणांची बदनामी करू नये. शेडचे काम हे चिरकाल टिकणारे असल्याने मजबूत आणि दर्जेदार केले जात आहे. यात कुठेही निकृष्ट काम झाले नाही. लवकरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

- जगदीश पाटील भोसीकर, सभापती, भोकर.

भोकर बाजार समितीच्या वतीने मोंढा परिसरात उभारण्यात येणाऱ्या लीलाव शेडचे कंत्राट मर्जीतील माणसाला देऊन हलक्या प्रतीचे काम केले जात आहे. बाजार समितीच्या उत्पन्नातून सदरील शेड उभारण्यात येत आहे. सभापती निधीबाबत जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत.

- गणेश कापसे बटाळकर, भाजपचे संचालक, भोकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT