file photo 
नांदेड

नांदेड : कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून आढावा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्राम पातळीपर्यत ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्याची केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या पथकात पाँडेचरी येथील जवाहरलाल इस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल एज्युकेशन ॲड रिसर्च (जीपमर) चे कम्युनिटी हेल्थ विभागाचे प्रमूख डॉ. पलनिवेलसी सहभागी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यंत्रणेमार्फत कोरोना उपाययोजनाबाबत जे नियोजन केले जात आहे त्यांची प्रत्यक्ष भेट देवून हे पथक आढावा घेत आहे.

शुक्रवारी (ता. नऊ) या पथकाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा आयडीएसपी सेल येथे भेट देवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासमवेत चर्चा करुन जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुक्याची संख्या, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तालुका पातळीवरील रुग्णालय, या सर्वामार्फत केले जाणारे उपचार, ऑनलाईन डाटा फिडींग प्रणाली याबाबी समजून घेतल्या. त्यानंतर विष्णुपुरी येथील  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आरटीपीसीआर लॅंब, कोविड केंअर सेंटर यांची पाहणी करुन माहिती घेतली. रुग्णांची अधिक संख्या असूनही उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

या पथकाने लोहा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भेट देवून काही बाधितांशी चर्चा केली. याचबरोबर कारेगाव येथे भेट देवून गावातील परिस्थिती समजून घेतली. या गावात होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण अंतर्गत उपचार घेणाऱ्या एका बाधिताची भेट घेवून चौकशी केली. गृहविलगीकरणाचे महत्व आणि यात डॉक्टराच्या निर्देशाप्रमाणे औषधोपचार होत असल्याची खातरजमा त्यांनी करुन घेतली. जिल्हा आरोग्य विभागातर्फे मोबाईल टेस्टींग व्हॅन, लसीकरण आदीची माहिती त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे यांच्याकडून समजून घेतली.  

हे पथक ता. आठ एप्रिल 2021 पासून जिल्हा दौऱ्यावर आहे. ता. आठ एप्रिल रोजी पथकाने नांदेड शहरातील जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर आदि ठिकाणी भेट देवून पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्याकडून आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT