Nanded Corporation sakal
नांदेड

Nanded Corporation : अनधिकृत बांधकाम तत्काळ पाडण्याचे पालिकेला आदेश ;माजी आमदार पटणेंनी केली होती तक्रार

सकाळ वृत्तसेवा

बिलोली : तहसील कार्यालयाच्या आवारात हनुमान मंदिर संकुलाच्या हद्दीत मालकी नसलेले व विनापरवानगी बेकायदेशीर केलेले पक्के बांधकाम तत्काळ पाडण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत. माजी आमदार व हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गंगाधरराव पटणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

तहसील कार्यालयालगत हनुमान मंदिर संकुलाच्या प्लॉट क्र.एकच्या बाजूस गंगाराम सिद्राम लघूळकर यांनी विना मालकीच्या जागेवर परवानगी न घेता बेकायदेशीररित्या पक्के बांधकाम सुरू केल्याने माजी आमदार पटणे यांनी हे काम थांबविण्याबाबत पालिकेकडे तक्रार केली होती.

परंतु तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत नीळे यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने पटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. उपजिल्हाधिकारी गिरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुरू असलेले व पूर्णत्वास आलेले पक्के बांधकाम पाडून संबंधितावर गुन्हा दाखल करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. असे निर्देश दिले.

शासकीय जागांवर अतिक्रमण

शहरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करून अतिक्रमणधारकावर कारवाईची मागणी माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादगे यांनीही केली. बिलोलीत महसूल, पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर ठिकठिकाणी अतिक्रमण केले असून यामुळे वाद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT