Nanded Tourism Sakal
नांदेड

Nanded Tourism : नांदेडमध्येही आहेत धोकादायक स्पॉट, निर्सगप्रेमींकडून काळजी घेण्याचे आवाहन

Nanded Dangerous Tourist Spot : लोणावळा येथील ३० जूनला भुशी धरणावर घडलेली दुर्घटना अतिसाहस करणाऱ्या पर्यटकांसाठी धडा घेण्यासारखी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : लोणावळा येथील ३० जूनला भुशी धरणावर घडलेली दुर्घटना अतिसाहस करणाऱ्या पर्यटकांसाठी धडा घेण्यासारखी आहे. नांदेड जिल्ह्यातही अशी गर्दीची ठिकाणे आहेत. प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा, माहूरजवळील शेख फरीद वझरा धबधबा यासह अन्य ठिकाणीही पर्यटक गर्दी करतात.

त्यामुळे भुशी दुर्घटनेच्या अनुषंगाने पावसाळ्यात नसते धाडस अंगलट येऊ शकते. त्यामुळे काळजी घेऊनच निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून करण्यात आले आहे.

आपल्या नांदेड परिसरातही अशी काही पावसाळ्यातील गर्दीची ठिकाणे आहेत. तेथे योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यातील सर्वांत धोकादायक ठिकाण म्हणजे सहस्रकुंड धबधबा. तेथेही यापूर्वी दुर्घटना घडलेल्या आहेत.

आता तेथे पूर्ण रेलिंग केल्यामुळे सुरक्षित झाला आहे. जलधारा परिसरात अशीच धबधब्यांची कुंडे आहेत. माहूरजवळील शेख फरीद वझरा धबधबा पावसाळ्यात प्रवाही होतो. या दोन्ही ठिकाणी पावसात कुंडात उतरणे धोक्याचे आहे.

भोकर जवळील शृंगऋषी जवळील नदीवरील बंधारा, जलधारा बंधारा, भाटेगाव बंधारा, देशमुख वाडी बंधारा, केदार गुडा बंधारा, तामसा रोडवरील लोहा बंधारा असे अनेक बंधारे पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात.

ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. भरपावसात या ठिकाणी पाण्यात अजिबात उतरू नये. भर पावसाळ्यातील अत्यंत धोकादायक ठिकाण म्हणजे बारुळ येथील धरण. अत्यंत रोमहर्षक असे येथील सांडव्यातील पाण्याचे दृश्य दिसत असल्यामुळे पर्यटक मोठी गर्दी करतात. परंतु, धरणावर जायला बंदी असल्यामुळे खाली सांडव्यातून निर्माण होणाऱ्या धबधब्यात उतरतात हे जिवावर बेतू शकते.

वन्यप्राण्यांचा अधिवास, वावर

पावसाळ्यात पाटणूर घाट, सीताखंडी घाट, केदार गुदा, माहूर, जलधारा अशा दाट जंगलात पावसाळी भटकंती म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असते. परंतु, अनुभवी ट्रेकर व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तेथे जाणे म्हणजे धोक्याला आमंत्रण असते.

अनेक जंगलांत वन्यप्राण्यांची अधिवास व वावर असतो. त्यामुळे तेथे वन विभागाचे गार्ड सोबत घेतल्याशिवाय जाऊ नये. कारण जिल्ह्यातील अनेक जंगलांत अस्वलांचा वावर वाढला आहे. बिबटे व रानडुकरेही हल्ला चढवू शकतात. पावसाळ्यात सापही मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध

नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या अनुषंगाने नदीपात्र परिसर, जलाशय, पूरपरिस्थिती पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटनस्थळांवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून १ जुलैपासून ३० ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत घोषित करण्यात आले आहे.

पर्यटनस्थळांवर जाऊन गर्दी करणे तसेच छोटी वाहने घेऊन जाणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे इत्यादी बाबींना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

मागील वर्षी ९ जाणांचा मृत्यू

जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस होतो. अशाप्रसंगी कमी उंचीच्या पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असले तरी नागरिक वाहने चालवतात. जिल्ह्यात मागील वर्षी (२०२३) पावसाळ्यात जास्त मृत्यू वाहून गेल्यामुळेच झाले आहेत.

पावसाळ्यात भटकंतीसाठी जाऊ नये असे अजिबात नाही, परंतु योग्य ती काळजी घेणे, अतिसाहस दाखवणे, उगाच उड्या मारणे, लहान मुलांना घेऊन पाण्यात उतरू नये, ट्रेकमध्ये माहिती नसलेल्या ठिकाणी पाण्यात उतरणे, पावसात झाडावर चढणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात आणि पावसाळी निसर्गाचा आनंद घ्यावा.

— डॉ. प्रमोद देशपांडे, (निसर्ग मित्रमंडळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT