electricity agricultural pump connection cut sakal
नांदेड

Nanded News: ऐन रब्बीत महावितरणचा शेतकऱ्यांना 'झटका'

कृषी पंपाचे वीजबील भरा अन्यथा कनेक्शन तोडू तोडणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वाधिक फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्याला महावितरण कंपनीने कृषी पंपाचे कनेक्शन तोडून झटका दिला आहे. खरिपातील पिके हातची गेल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असलेल्या शेतकर्‍यांचे हिरवी स्वप्न महावितरणने धुळीत मिळविली आहेत. कृषी पंपाचे वीजबील भरा अन्यथा कनेक्शन तोडू अशी सुचना देवून जिल्ह्यातील थ्री फेज वीज कनेक्शन बुधवारी (ता.२३) तोडले आहे.

जिल्ह्यात यंदा जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या काळात अनेकवेळा अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसह कपाशी, उडीद, मुग, ज्वारी या जिरायती पिकांचे मोठे नुकसान झाले. यासोबतच हळद, भाजीपाला व फळपिकेही यात वाहून गेली होती. अतिवृष्टीमुळे सात लाख शेतकर्‍यांच्या पाच लाख पंचवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांचा महत्वाचा हंगाम अतिवृष्टीच्या आहारी केल्यामुळे शेतकर्‍यांना शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतर्ंगत राज्यात सर्वाधीक ७१८ कोटींची भरपाई दिली होती. तर विमा कंपनीकडूनही सध्या ३६८ कोटींचे अग्रीम स्वरुपात परतावा वाटप सुरु आहे.

अशा अडचणीच्या काळातून शेतकरी असताना महावितरणने ऐन रब्बी पिकांच्या काळात वीज कनेक्शन तोडून शेतकर्‍यांची हिरवी स्वप्न पायदळी तुडविली आहेत. जिल्ह्याच्या सर्वच भागात सध्या रब्बीची पेरणी सुरु आहे. अनेक शेतकर्‍यांनी हरभरा, करडई, रब्बी ज्वारी या पिकांची पेरणी केली. तर पाण्याची व्यवस्था असणार्‍या शेतकर्‍यांनी गव्हाची पेरणी करुन पाणी देण्याची तयारी असतांना कृषी पंपाचे बील भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू असे संदेश देवून बुधवारी (ता.२३) थ्री फेज कनेक्शन तोडले आहे. यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधीत शेतकरी धास्तावले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशाला हरताळ

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरिपात नुकसान झाल्यामुळे कृषी पंपाचे कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु महावितरणने शासनाच्या आदेशाला हरताळ फासवत रब्बी पिकांच्या महत्वाच्या काळात कृषी पंपाचे कनेक्शन तोडले आहे. याबाबत शेतकर्‍यांत अंसंतोष निर्माण झाला आहे.

आठ तासही वीज सुरळीत नाही

जिल्ह्यात कृषी पंपाच्या विजेची परिस्थिती वाईट आहे. कृषी पंपाना सात दिवस दिवस तर सात दिवस रात्री आठ तास वीज दिली जाते. परंतु या काळात कमी दाबाची वीज अनेकवेळा ट्रीप होते. यामुळे शेतकर्‍यांना आठ तासापेकी केवळ तीन तासच वीज मिळते. कृषी पंपाच्या विजेची अशी अवस्था असताना जिल्ह्यातील सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष मात्र मुग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात मात्र शेतकर्‍यांना २४ तास मोफत वीज दिली जाते.

डीपी जळाल्यानंतर पंधरा दिवस चकरा माराव्या लागतात. मिळालेला डिपीही शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने आणावा लागतो. बसविण्यासाठीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एवढे करूनही व्होल्टेजची अडचण कायमच असते. याकडे संबंधितांनी लक्ष देवून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी.

- व्यंकट संभाजीराव गोत्राम,शेतकरी, वडगाव, ता. लोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT