नांदेड : नांदेडपासून वीस किलोमीटरवर असलेले इजळी हे सिंचनाची बारमाही व्यवस्था असलेले मुदखेड तालुक्यातील सुखी-संपन्न गाव. केळी, ऊस, हळद या बागायती पिकांसह सोयाबीन, कपाशी, ज्वारी आदी पिके घेतली जातात. रब्बीमध्ये गहू, हरभरा, करडी आदी पिकांची लागवड केली जाते. अलिकडच्या काळात फुलपिकेही या ठिकाणी घेतली जात आहेत. याच गावातील अल्पभूधारक शेतकरी रुस्तुमा मुंगल यांना वडिलोपार्जीत पाच एकर जमिन हिश्याला आलेली.या शेतीतून तीन मुलं व एका मुलीचे शिक्षण देताना कसरत होत होती.
अशावेळी घरच्या तीन म्हशीच्या माध्यमातून लहानसा दुधाचा व्यवसाय सुरु होता. मुले मोठी झाली आणि खर्च वाढला. यातून मार्ग कसा काढावा या विवंचनेत असलेल्या रुस्तुम यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुगला आनंद यांनी जनावरं वाढवून दुधाचा व्यवसाय करण्याचा चंब बांधला. तर थोरला मुलगा अभिमन्यू यांनी दिड एकरात गुलाब फुलांची शेती सुरु केली. आइ-वडीलांसह तिघांचे कुटुंब सध्या यात राबत असल्याने आज सोन्याचा दिवस ते बघत आहेत.
दुग्धव्यवसायात तरुण भावंडं स्थीरावले
इजळीचे अल्पभूधारक शेतकरी रुस्तुमा मुंगल यांना अभिमन्यू, आनंदा व अविनाश अशी तीन मुले तर एक मुलगी. मुले मोठी झाल्यावर कमी जमिनीमध्ये उत्पन्न घेऊन गुजरान कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. घरी दुभती जनावरं होती, परंतु त्याला व्यवसायीकतेची जोड नव्हती. यामुळे त्यांचे उत्पन्न जेमतेम होते. गावाजवळच मुदखेड येथे केंद्रीय रिझर्व पोलिस बलाचे प्रशिक्षण (सीआरपीएफ) केंद्र असल्यामुळे दर्जेदार दुधाची मागणी लक्षात
घेता या व्यवसातून चांगले उत्पादन मिळू शकते असे आनंद मुंगल यांनी ठरवून दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी दोन म्हशी पासून सुरूकेलेला व्यवसाय आज वटवृक्षात रूपांतर झाला आहे. पहिल्यांदा घरच्या तीन म्हशी पासून निघणारे दूध गावात विक्री करत होते.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : आठवडे बाजाराचे महत्त्व होतेय कमी -
दुधाचा व्यवसाय वाढविला
२०११ मध्ये दुग्ध व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड तसेच परभणी बाजारातून पाच जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. त्याकाळी दिवसाकाठी पन्नास
लिटर दूध निघते असे. हे दूध मुदखेड येथे घरगुती वीस रुपये दराने विकायचे. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी रिलायन्स डेअरीला दूध देणे सुरू केले. यानंतर
आंध्र प्रदेशातील हेरिटेज दुध डेअरी प्रकल्पाच्या देवकी दूध संकलन केंद्राला दूध द्यायला सुरुवात केली. या दूध संकलन केंद्राचा बांधीव भाव होता. म्हशीचे दूध प्रति लिटर ५० रुपये तर गाईचे दूध ३० रुपये लिटर दराने विक्री होते. सध्या आनंद मुंगल यांच्याकडे २९ जनावरं आहेत. यात दुधाच्या जाफराबादी सहा म्हशी तर दुधाच्या चार संकरित गाई आहेत. इतरही तीन म्हशी व एक गाय आहे. या सोबतच पाच कारवाडी पाच वगारीचे संगोपनही त्यांनी केले
आहे.
जातीवंत जाफ्राबादी रेडा
घरच्या म्हशींना भरण्यासाठी जातिवंत जाफराबादी रेडा आनंद मुंगल यांनी पाळला आहे. तसेच घरच्या म्हशीचा एक दुसरा रेडाही त्यांच्याकडे आहे.
घरच्या म्हशीसोबत बाहेरच्या म्हशीही ते भरवतात. यातून त्यांना वर्षभरात सत्तर हजार रुपये मिळतात, असे आनंद मुंगल यांनी सांगीतले.दररोज शंभर लिटर दुधाचे उत्पादन पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत आनंदसह त्यांचे भाऊ दुध काढण्यासाठी मदत करतात. सध्या आनंद मुंगल यांच्याकडे सहा म्हशी व चार गाई दुधाच्या आहेत. या गाईपासून दोन वेळेचे दूध ४० लिटर निघते. म्हशीपासून दोन वेळा ६० लिटर दुध निघते. सध्या एकूण शंभर लिटर दुधाचे उत्पादन आहे. म्हशीच्या दुधाला पन्नास रुपये तर गाईच्या दुधाला तीस रुपये दर मिळतो. हे दुध मुदखेड येथील आंध्र प्रदेशातील हेरिटेज दुध डेअरी प्रकल्पाच्या देवकी दूध संकलन केंद्राला दिले जाते. दुधाचा दर ठरलेला आहे.
महिन्याला सव्वा लाखाचे उत्पादन
दररोज शंभर लिटर दुधाचे चार हजार दोनशे रुपये मिळतात. तर महिन्याला एक लाख २६ हजार रुपयाचे दूध तर अडीच हजार रुपयांचे शेणखत असा एक लाख २८ हजार पाचशे रुपयाच्या उत्पन्न होते. या जनावरांसाठी दररोज तीस किलो सरकी पेंड व वीस किलो भरडलेला मका दिला जातो. तसेच मिनरल मिक्सर एक किलो, हिरवा व वाळलेला चारा दिवसातून दोन वेळा दिला जातो. यासोबतच म्हशीला लागणाऱ्या औषधोपचाराची व्यवस्था वेळोवेळी केली जाते. एकंदरीत खर्च वजा जाता महिन्याकाठी साठ ते सत्तर हजार रुपये निव्वळ नफा राहतो, असे आनंद मुंगल सांगतात. यासोबतच दरवर्षी २५ ट्रॉली शेणखत या जनावरापासून उपलब्ध होते.
कमी खर्चातील गोठा
दुधाळ जनावरांसाठी कमी खर्चामध्ये पंचवीस बाय साठ व २१ बाय ५० फुट आकाराचे शेड बांधकाम केले आहे. शेडच्या बाजुलाच जनावरांचे मलमूत्र जमा करण्यासाठी दहा बाय पंधरा फुट आकाराचा खड्डा करून त्यात प्लास्टिक आच्छादन केले आहे. यात एक एचपीची मोटार बसून ते पाणी शेतीला दिले जाते. यातून उत्कृष्ट प्रकारचे पिके येते असे आनंदा मुंगल यांनी सांगितले. यासोबतच शेणखताचीही व्यवस्था होत असल्याने यांना रासायनिक खतासाठ लागणारा खर्च वाचतो.
दिड एकरमध्ये हिरवा चारा पिक
जनावरांना हिरवा चारा देण्यासाठी त्यांनी दीड एकर मध्ये चारा पिके घेतली आहेत. यात एक एकर मध्ये यशवंत गवत टप्प्याटप्प्याने लागवड केले आहे. तर अर्धा एकरमध्ये न्यू नेपियर गवताची लागवड केली आहे. या सोबतच वाळलेल्या चाऱ्याची नियोजनही केले जाते. यासाठी कडबा, गहूस, सोयाबीन, हरभराचे काढं जमा केले जाते. दुधाचा फट लागावा, यासाठी तीस टक्के वाळला चारा तर सत्तर टक्के हिरवा चारा दिला जातो.
जनावरांच्या आरोग्याची काळजी जनावरांच्या आरोग्याची काळजी वेळोवेळी घेतली जाते. लसीकरण तसेच विविध औषधोपचारासाठी मुदखेड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. बी. बुचलवार, डॉ. राठोड तसेच डॉ. मंगेश हेमके हे वेळोवेळी घेऊन जनावराची आरोग्याची काळजी घेतात.
इतर बाबींपासून मिळते उत्पादन
घरच्या जातिवंत जनावरांची पैदास होत असल्याने याठिकाणी गाईच्या चार कालवडी व पाच जाफराबादी म्हशीच्या वगारी आहेत. यामुळे दुधासाठी त्यांना
नवीन जनावरे घ्यावे लागत नाही. यासोबतच जाफराबादी जातीचे दोन रेडे असल्यामुळे घरच्या म्हशीसह बाहेरच्या म्हसींना भरले जाते. या रेड्यापासून
वर्षाला ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते असे आनंद मुंगल यांनी सांगितले. यासोबतच दुधाच्या उत्पन्नावर मिनी ट्रॅक्टर घेतले आहे. यातून घरच्या
शेतीची आंतरमशागत करून इतरांची शेती कसली जाते. यापासून वर्षाला दीड लाख रुपये उत्पन्न मिळते, असे आनंद मुंगल यांनी सांगितले.
दोन एकर मधील गुलाब शेतीने दिला आधार
अभिमन्यू मुंगल यांनी शेतीमध्ये बागायती पिके न घेता फुलशेती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांनी दोन एकरावर शिर्डी गुलाबाची लागवड केली आहे.
२०१४ मध्ये गुलाबाची लागवड केली जानेवारी 2015 पासून गुलाबाची उत्पन्न सुरू झाले हा गुलाब नांदेड येथील ठोक बाजारात विक्री केला जातो. सुटे
गुलाब आणि काडी गुलाब असे दोन प्रकार आहेत. सुट्टी गुलाबाची उत्पन्न रोज वीस किलो निघते. या सरासरी पन्नास रुपये दर मिळतो. यासोबतच काडी गुलाब रोज पाचशे काडी निघते. या काडी मुलाबास प्रति नग एक रुपया दर मिळतो. या गुलाबापासून दररोज पाचशे रुपये उत्पन्न मिळते. एकंदरीत गुलाबापासून रोज दीड हजार रुपयाचे उत्पन्न निघते. महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये या गुलाबापासून मिळतात. गुलाब लागवड, फवारणी व वाहतूक खर्च सात हजार वगळता गुलाबापासून निव्वळ नफा ३८ हजार रुपये राहते असे अभिमन्यू मुंगल यांनी सांगितलें.
पक्क्या घराचे स्वप्न झाले पूर्ण
रुस्तूमा मुंगल यांना पूर्वी पक्के घर नव्हते. कमी जागेत राहताना अडच येत होती. अशात मुलांची दुग्ध व्यवसाय व गुलाब शेतीवर चांगली मिळकत
मिळविल्यामुळे मागील वर्षी शेतात पन्नास लाख खर्चून दुमली घर बांधले आहे. यात तीन मुलांना स्वतंत्र राहता येइल, अशी व्यवस्था केली आहे. तसेच एक दुकानही काढले आहे. शेतातील कष्टाने घराचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे घरात शांत झोप लागते असे रुस्तूमा मुंगल यांनी सांगीतले.
- आनंद रुस्तूमा मुंगल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.