Nanded farmer banana agriculture loss sakal
नांदेड

नांदेड : हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने खरिप पिकांना मोठा फटका बसला आहे. सांगवी, पासदगावसह अर्धापूर, हदगाव, भोकर, हिमायतनगर, किनवट, माहूर आदी भागातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर काही ठिकाणचे रस्ते अजूनही पाण्याख्याली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अस्मानी संकटामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वच जण चिंतीत झाले होते. पेरण्याही लांबल्या होत्या. मत्र गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. सतत चार दिवसांपासून कधी अधिक तीव्रतेने पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, शुक्रवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवार सकाळपर्यंत हा पाऊस सुरुच होता. रविवारीही सूर्याचे दर्शन झाले नाही, परिणामी शुक्रवार, शनिवारी पडलेल्या पवसाने आसना नदीला पूर आला. या मुळे या भागात नदीकाठी असलेली शेकडो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. अर्धापूरमधील मालेगाव, मेंढला, देळूब, शेलगाव, शेणी, बामणी, कोंढा, गणपूर आदी गावात पुर परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. यासह हदगाव तालुक्यातील तामसा उमरी, पाथरड, भोकर तालुक्यातील लगळूद, रावणगाव, डोरगाव, मातुळ, तर हिमायतनगरातील पळसपुर, धारापूर, अंदेव, टेंभी, सवना, खैरगाव, सिल्लोड या गावातील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गत २४ तासांत सरासरी ४३.६० मि.मी. पाऊस

जिल्ह्यात रविवारी (ता.दहा) २४ तासात सरासरी ४३.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण ३५७.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये, कंसात एकूण पाऊस : नांदेड- १९.१० (३८३.९०) बिलोली-७६.१० (३२९.८०), मुखेड- ४४.९० (३८२), कंधार-४१.७० (४२६.६०), लोहा-३१.५० (३६३), हदगाव-२५.९० (२७३.८०), भोकर- ५३ (३२६.३०), देगलूर-४४.९० (३७५.८०), किनवट-५० (३५०.१०), मुदखेड- ३४.१० (४६४.२०), हिमायतनगर-४४.१० (४३३.८०), माहूर- ५१.५० (२७०.७०), धर्माबाद-५१.२० (३२२.१०), उमरी- ७२ (४.०७.५०), अर्धापूर- 3३१.३० (३४३.६०), नायगाव- ४६.१० (२९२.५०) मिलीमीटर आहे.

ओढ्याच्या पुरात तरुण वाहून गेला

ओढ्याला आलेल्या पुरात एक ३२ वर्षीय तरुण वाहून गेला आहे. सदर तरुण अर्धापूर तालुक्यातील असल्याची माहिती असून त्याचे नाव अंकुश हरीचंद्र सावंत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पेठवडजवरून नांदेडकडे येत असताना चिखली ते दहीकळंब रस्त्यावरील एका ओढ्यात वाहून गेला या ठिकाणी (एम.एच.-२६, एजी-६९७) या क्रमांकाची दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे.

हवामान विभागाने आॅरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्राला पुढील तीन दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. नांदेडसह राज्यातील काही ठिकाणी यादरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्क राहावे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पुरपरिस्थिती नियंत्रणात आहे.

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT