माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  sakal
नांदेड

Nanded : नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवावेत; जिल्ह्यांतील नेत्यांची मागणी

दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी अशोक चव्हाणांकडे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड व हिंगोली हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात असून येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडेच कायम ठेवावेत, अशी मागणी या दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीत शनिवारी (ता. चार) ही मागणी करण्यात आली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नसिम खान, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश सहप्रभारी संपत कुमार, आशिष दुवा, सोनल पटेल, सेवादलाचे प्रदेश समन्वयक विलास औताडे आदींनी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देतील, तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू, असा विश्वास दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवत असल्याचे बैठकीअंती जाहीर केले. जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी बळकट असून,

विधानसभा मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या व सहकारी संस्थांवर मजबूत पकड असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर यावेळी म्हणाले. भारत जोडो यात्रेमुळे चांगली वातावरण निर्मिती झाली असून, अशोक चव्हाण यांनी पालकमंत्री असताना विकासकामांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्याने मतदार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला (ठाकरे गट) सोबत घेऊन काम करीत असल्याने एकीचे वातावरण असल्याचे सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, ईश्वरराव भोसीकर आदींनीही या बैठकीत आपली मते मांडली.

हिंगोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई देशमुख, आमदार प्रज्ञाताई सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, हरिभाऊ शेळके, सचिव सचिन नाईक आदींनी मते मांडली. हिंगोली मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला असला तरी आता त्या पक्षात उभी फूट पडली आहे. आजमितीस जिल्ह्यात काँग्रेस सर्वाधिक बळकट असा राजकीय पक्ष आहे. भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेसनेच लढवावी, अशी मागणी नेते व पदाधिकाऱ्यांनी केली.

या बैठकीला आमदार मोहन हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश सचिव अॅड. सुरेंद्र घोडजकर, अर्चना राठोड, बाजार समितीचे अध्यक्ष संजय लहानकर, महिला काँग्रेसच्या प्रभारी डॉ. वंदनाताई मुरकुटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT