Nanded Illegal sale of biodiesel 35 lakh confiscated  sakal
नांदेड

नांदेड मारतळ्यात अवैध बायोडिझेलची विक्री

३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यंत्रणेला जाग

सकाळ वृत्तसेवा

मारतळा‌ : नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावरील (Nanded - Hyderabad State Highway) मारतळा (ता. लोहा) शिवारात असलेल्या चंद्रलोकच्या पाठीमागे अवैध बायोडिझेल (Biodiesel) विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलेल्या आदेशानंतर लोहा महसूल व उस्माननगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. त्यात सहाशे लिटर बायोडिझेल, दोन ट्रक, मोजमाप यंत्र, इलेक्ट्रिक मशीन पाईप असा एकूण ३४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी (ता. २८) रात्री कारवाई करून जप्त केला आहे.

दरम्यान, हे पथक पाहताच विक्री करणारे रॅकेट फरार झाले. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात लोह्याचे नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने होते. तोपर्यंत महसूल व पोलीस यंत्रणा हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसते, हे विशेष.

याबाबत उस्माननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या मारतळा शिवारातील हातनी फाट्याजवळ हॉटेल चंद्रलोकच्या पाठीमागे अवैध बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी व पुरवठा विभाग यांना मिळाली. त्यावरून ही माहिती लोहा महसूल व उस्माननगर पोलिसांना देत वरिष्ठांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले. तेव्हा लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार राम बोरगावकर, मारतळा सज्जाचे तलाठी मनोज जाधव, संदीप कल्याणकर, राजू इंगळे व उस्माननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, फौजदार बाबासाहेब थोरे, जमादार कानगुले यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री तपासणी केली. त्यात नंबर प्लेट नसलेल्या एका आयचर ट्रकमध्ये १२ हजार लिटर क्षमतेची टाकी आढळून आली व त्यात सहाशे लिटर अवैध बायोडिझेल होते.

ट्रक (क्रमांक ए.पी.२४ व्ही.२७२३) या मध्ये एका इलेक्ट्रिक मशीन व मोजमाप यंत्राच्या साह्याने भरत असल्याचे आढळून आले. तेव्हा पथक तेथे पोहोचताच विक्री करणारे कामगार फरार झाले. त्यानंतर या पथकाने रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून व बायोडिझेलचे नमुने एका काचेच्या बाटलीत घेऊन पंचासमक्ष सील करून पंच व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचानामा करण्याचा सोपस्कार आटोपला. त्यानंतर ३४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत उस्मानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला व गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हाधिकारी झाले आक्रमक

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे बायोडिझेल प्रकरणात आक्रमक झाले असून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी रात्री कांदा मार्केटजवळ कारवाई करण्यात आली. ते स्वतः घटनास्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत होते. या ठिकाणी पाच ट्रक पकडण्यात आले असून ते नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लावण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT