rain sakal
नांदेड

नांदेड : पावसाचा सुधारित अंदाज ठरला फेल

किनवट तालुक्यात सरासरीपेक्षा १६.५ टक्के पाऊस कमी

सकाळ वृत्तसेवा

किनवट : शहर व परिसरात रविवारी दमदार पाऊस झाला. या मुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात जूनमध्ये पावसाने अपेक्षाभंग करीत तब्बल १९ दिवस दडी मारली होती. पावसाळ्यातील पहिल्या महिन्याच्या ३० दिवसांत केवळ ११ दिवस पाऊस पडलेला आहे. किनवट तालुक्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १८९.५ मि.मी. आहे. मात्र प्रत्यक्षात जूनमध्ये तालुक्यात १५८.२ मि.मी. पाऊस पडला आहे. जून सरासरीच्या १६.५ टक्के कमी पाऊस झालेला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) एक जूनला पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला होता. त्यात पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यातही जून महिन्यात पाऊस सरासरी गाठेल असे भाकित व्यक्त केले होते. मात्र, तो तालुक्यासाठी तरी सपशेल खोटा ठरलेला आहे.

गत वर्षी जून अखेरपर्यंत केवळ १४ दिवस पाऊस पडूनही सरासरी २७३.६ मि.मी. अर्थात सरासरीच्या १४४.४ टक्के पाऊस पडला होता. त्यात एकदा मांडवी व दहेली मंडळात पहिली अतिवृष्टी झाली होती. यंदा जूनच्या ता.१२ ते ता.२६ तारखेदरम्यान १३, १८, २० व २३ या तारखेचे चार दिवस सोडून अकरा दिवसामध्ये सरासरी १५८.२ मि.मी. पाऊस पडलेला आहे. जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे, पावसाचा जोर कमी असल्याचे कारण हवामान खात्याने दिले आहे.

अशी स्थिती जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देखील राहण्याची स्थिती असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून तालुक्यातील नऊ मंडळापैकी सहा मंडळातील बहुतांश कोरडवाहू शेती करणारे शेतकरी फुटलेले कोंब करपून पेरणी वाया जाते की काय? म्हणून चिंताग्रस्त झालेले आहेत. सुदैवाने तालक्यातील नऊ मंडळापैकी इस्लापूर, जलधरा व शिवणी या तीन मंडळात मात्र पावसाने जूनची सरासरी गाठलेली आहे. पुढील तीन दिवस अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, तो खरा ठरला आहे. कालच्या पावसाने तालुक्यातील पिके वाचणार आहेत.

एकूण पर्जन्यमान

तालुक्यातील नऊ मंडळात जून महिन्यात पडलेले एकूण पर्जन्यमान व पुढील कंसात त्याची टक्केवारी दिलेली आहे. किनवट- १३८ (७२.८ मि.मी.); बोधडी- १५२.८ मि.मी.(८०.६); इस्लापूर- १९८.५ मि.मी.(१०४.७); जलधरा- १९६.८ मि.मी.(१०३.९); शिवणी- १९७.१ मि.मी.(१०४); मांडवी-१३४.६ मि.मी. (७१); दहेली- १४७.५ मि.मी.(७७.८), सिंदगी मोह.-१०९.१ मि.मी.(५७.६ ); उमरी बाजार- १४९.४ मि.मी. (७८.८).

पाण्याच्या साठ्यात फारशी वाढ नाही

तालुक्यातील एकूण २१ लहान-मोठ्या जलप्रकल्पांतील उपयुक्त पाण्याच्या साठ्यात फारशी वाढ झालेली नाही. तालुक्यात मृगामध्ये पेरणी साधण्यासाठी बहुतांश शेतकरी धूळपेरणी करतात. शंभर मि.मी. पाऊस झालेला नसतांनाही तालुक्यातील ५० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. सध्या ९० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रात पिकांची लागवड झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT