Nanded Kinwat taluka Cotton sector grows by 11% sakal
नांदेड

नांदेड : कापसाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा ११ टक्के वाढ

किनवट तालुक्यातील चित्र; पांढऱ्या सोन्याला भाव आल्याने निर्णय

सकाळ वृत्तसेवा

किनवट : तालुक्यातील कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार ५६३ हेक्टर आहे. गत दोन - तीन वर्षापासून अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, मान्सूनोत्तर लांबलेला पाऊस पर्यायाने कापसावर रोगराई व गुलाबी बोंडअळीसह इतर किटकांच्या हल्ल्यामुळे दरवर्षी उतारा घटतच होता. बाजारात भावही अपेक्षित मिळत नसल्याने उत्तरोत्तर कापसापेक्षा सोयाबीनलाच शेतकर्‍यांनी पसंती दिली होती. मात्र, गतवर्षी कापूस विक्रीसाठी आधारभूत किंमत पाच हजार ७२६ रुपये होती. मात्र, भाव शेवटी शेवटी बारा हजारापर्यंत गेल्यामुळे शेतकर्‍यांनी परत एकदा कापूस लागवड करून नशीब आजमावण्याचे ठरवलेले दिसते. यंदा कापसाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा अकरा टक्के वाढ होऊन ४६ हजार १३६ हेक्टरवर पेरले जाण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ३२ हेक्टर आहे. गत तीन वर्षापासून कापसातील नुकसानीमुळे सोयाबीनच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते, दाण्यांची प्रत खालावली होती. त्यामुळे उतार घटला परिणामी दर तेजीत आले. गतवर्षी सोयाबीनला तीन हजार ९५० रुपये प्रती क्विंटल आधारभूत किंमत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात बाजारपेठेत सोयाबीनला प्रती क्विंटल साडेसात हजार ते आठ हजार रुपये भाव मिळाला. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या क्षेत्रातही दहा टक्के वाढ होऊन २८ हजार ४३७ हेक्टरवर सोयाबीन पेरले जाण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

यंदा देशात १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळनंतर दक्षिण कर्नाटक व तामिळनाडूच्या काही भागात पोहोचलेला आहे. येत्या पाच - सहा दिवसात कोकणातून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT