Nanded Lok Sabha 2024: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ अशी याची ओळख आहे. कॉँग्रेसचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांनी छाप उमटविली मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर ते लगेच राज्यसभेवर खासदारही झाले आहेत.२०१९ ला विजयी झालेले भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा भाजपतर्फे उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसतर्फे वसंतराव चव्हाण रिंगणात आहेत. ही दुरंगी लढत वाटत असली तरी ‘वंचित’ व ‘एमआयएम’ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच सकल मराठा समाजाचा काय निर्णय होणार? याचीही उत्सुकता असेल.
प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विजयी मते : ४, ८६,८०६
अशोक चव्हाण (काँग्रेस) मते : ४,४६,६५८
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४०,१४८
२००४ः भाजप,
२००९ः कॉँग्रेस,
२०१४ः कॉँग्रेस,
२०१९ः भाजप
मुस्लिम आणि दलित मतदारांचा कौल अत्यंत महत्वाचा
अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याने पक्षाला फायदा होईल
मराठा आंदोलनाला जिल्ह्यात मिळालेले यश बघता मराठा समाजाची भूमिका महत्वाची
नवीन युवा मतदाराचा कौल कुणाकडे वळणार हे गुलदस्तात
ओबीसी समाजाकडूनही निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी
एकही मोठा उद्योग नसलेला जिल्हा
साखर कारखाने आहेत पण शेतीपूरक उद्योगही महत्वाचे
वाढती बेरोजगारी आणि नोकरी, कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
रेल्वे मार्ग, विद्युतीकरणाचे काम संथगतीने, वंदे भारतची मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.