file photo 
नांदेड

नांदेड : ११ एप्रिल रोजी वंचितच्या वतिने मोर्चा; काय आहे कारण ? फारुक अहमदचा इशारा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एप्रिल महिना हा भीमजयंती, रमजान मास प्रारंभ व पाडवा या तिन मोठ्या सण- उत्सवांचा महिना असून या तीन सण उत्सवाच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला नाडा विकणाऱ्या फेरीवाल्यापासून ते ट्रक व ट्रॅक्टर विकणाऱ्या मोठ्या व्यापा-यांसाठी वर्षातील सर्वात मोठी व्यापाराची संधी असते. मात्र राज्य सरकारच्या ब्रेक द चैनच्या नावाखाली लावलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापा-यापासून मोठे उद्योगपतीपर्यंत सर्वांवर अन्याय कारक ठरणार आहे त्यामुळे या जाचक अटी रद्द करुन बाजारपेठ पुर्ववत चालू ठेवावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने ता. ११ एप्रिल रोजी नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व समविचारी संघटनांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढील मागण्या मांडल्या आहेत. 
१- नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापले दुकाने व प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात यावी.
२- नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गल्ली स्तरापर्यंत वाढलेला असून प्रत्येक दोन ते तीन घरांच्या मागे एक रुग्ण आढळून येत आहे त्या तुलनेने शासन आणि प्रशासनाच्या वतीने आरोग्य सुविधा देण्यामध्ये शासन अपयशी पडत आहे त्यामुळे नांदेड येथे स्टेडियम अथवा आय टी एम कॉलेज किंवा इतर कोणतेही महाविद्यालय व मोठ्या इमारती ताब्यात घेऊन तात्काळ एक हजार रुग्णाचे 2 जम्बो हॉस्पिटल नांदेड येथे सुरू करण्यात यावे व तेथे किमान दोनशे ते तीनशे आयसीयू बेड आणि किमान दोनशे ते तीनशे ऑक्सिजनचे पेड या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

-३ नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधल्या आयसीयू मधील 50% बेड हे सर्वसामान्य लोकांसाठी आरक्षित करून महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याची व्यवस्था करण्यात यावी खाजगी हॉस्पिटल व खाजगी जनरल प्रॅक्टिशनर यांना कोरोनाचे रुग्ण तपासण्याची व रेमडिसीव्हीर इंजेक्शन स्तराच्या ट्रीटमेंट करण्याची मुभा देण्यात यावी, व नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्सला रेमडिसीव्हीरचे इंजेक्शन उपलब्ध करून विकण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून या इंजेक्शनची काळाबाजारी होणार नाही व सर्वत्र हा इंजेक्शन उपलब्ध होईल.
 
- ४ उपरोक्त विषयी आम्ही अशी मागणी करतो की येत्या दहा तारखेपर्यंत मोठ्याप्रमाणावर व्हॅक्सिनेशनचे नियोजन करून जेजे दुकानदार आप-आपल्या परिवारातील पंचेचाळीस वर्षे वयाच्या वरील सदस्यांना व्हॅक्सिनेशनचे करून घेतील त्यांना ब्रेक द चैन या  लॉकडाऊन मधून मुक्त करण्यात यावे व महानगरपालिकेचे अथवा खाजगी शाळा घेऊन तेथे ऑक्सिजन बेड सहित आयसोलेशन केंद्र उभारावे व महानगरपालिकाचे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे कोवीड हॉस्पिटल व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन सहित या सुविधा देऊन सुरू करण्यात यावे, व मुबलक प्रमाणामध्ये रेमडिसीव्हीर सहित सर्व औषध गोळ्यांचे पुरवठा करण्यात यावा.
 
- ५ तसेच नांदेड शहरातील पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्व गरजूंना साखर तेल सहित सर्व राशन किमान दोन महिन्याचे दर्जेदार राशन मोफत व घरोघरी कीट निहाय वाटप करण्यात यावे.

- ६ कोवीड नियमांना अधीन राहून नांदेड शहरातील सलून दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच चहाच्या टपऱ्या छोट्या- छोट्या हॉटेल- रेस्टॉरंट यांनाही नियमाच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. 

उपरोक्त सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन येत्या दहा तारखेपर्यंत जर सदरील मागण्या मान्य झाले नाही तर 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्यावर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आयटीआय पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व व्यापारी संघटना व सामाजिक संघटना व इतर समविचारी पक्षांच्या मदतीने मोठे जनआंदोलनात्मक ब्रेक द लॉकडाऊन साठी महामोर्चा काढण्यात येईल. निवेदनावर गोविंद दळवी फारुक अहमद डॉ. संघरत्न कु-हे, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले विठ्ठल गायकवाड अयुब खान साहेबराव बेळे, श्याम कांबळे, ॲड शेख बिलाल, उत्तम धर्मेकर इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT