नांदेड - नूतन महापौर मोहिनी विजय येवनकर आणि उपमहापौर मसूद खान यांच्या कार्यकाळातील नांदेड वाघाळा महापालिकेची पहिली आॅनलाइन सभा सोमवारी (ता. २६) दुपारी पार पडली. अर्धा तास चाललेल्या या सभेत ३५ विषयांना मंजूरी देण्यात आली.
महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला उपमहापौर मसूद खान, आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
महापौरांना दिले अधिकार
या सभेत ता. १९ मार्च रोजीच्या सभेतील दोन विषय वगळता ३५ विविध विभागाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदतवाढ आणि मानधन वाढवणे यासह इतर महत्वाचे विषय होते. सभागृहाने ३५ विषयांना मान्यता देत महापौर येवनकर यांना मंजुरीचे सर्वाधिकार दिले.
कंत्राटी पदाबाबत चर्चा
विरोधी पक्षनेते रावत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विषयांवर मत मांडले. त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनामुळे महापालिकेचा आर्थिक भार वाढत असून आस्थापनेवरील खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सांगितले. आस्थापनावरील खर्च वाढू नये, याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेतील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ८६ कंत्राटी पदांना मंजूरी देण्यात आली.
हेही वाचलेच पाहिजे - बाप रे बाप ! कोविड सेंटरमध्ये घुसला साप- डॉक्टर, कर्मचाऱ्यासह रुग्णांचीही तारांबळ
महापालिकेच्या हिताचे निर्णय घेणार - महापौर
महापौर मोहिनी येवनकर म्हणाल्या की, आजची सभा ही माझी पहिलीच सभा आहे. या सभेत माझ्यावर विश्वास दाखवून मला निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याबद्दल आभार. महापालिकेतील पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. कोरोना संसर्गाच्या काळात महापालिकेच्या कंत्राटी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन यापुढेही आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे महापौर येवनकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.