कंधार : तालुक्याचे अधिकृत संकेतस्थळ गेल्या सहा वर्षांपासून अपडेट करण्यात आले नाही. या मुळे नागरिकांना संकेतस्थळावर सर्व चुकीची माहिती वाचायला मिळत आहे. अशोक चव्हाण आमदार असताना त्यांना खासदार तर प्रताप पाटील चिखलीकर खासदार असूनही त्यांची आमदार म्हणून नोंद आहे. अरुण डोंगरे यांची जिल्हाधिकारी आणि अशोक शिनगारे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्री म्हणूनच नोंद आहे. या सर्व बाबींमुळे तालुक्याच्या संकेतस्थळावर माहिती मिळवताना धांदल उडत असून गेल्या सहा वर्षांपासून हे संकेतस्थळ का? अपडेट करण्यात आले नाही? प्रशासन एवढे बेजबाबदार कसे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
डिजिटल प्रणालीमुळे सर्व जग मुठ्ठीमध्ये आलेय. देशात एक जुलै २०१५ पासून ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रशासनिक कामात अधिक पारदर्शकता यावी, प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवा, तसेच शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवा व तो अधिक लोकाभिमुख व्हावा असा उदात्त हेतू या मागे आहे. परंतू तालुक्याचे अधिकृत संकेतस्थळ गेल्या सहा वर्षापासून अपडेट करण्यात आले नाही. सहा वर्षा पूर्वीची माहिती संकेतस्थळावर जशीची तशी असल्याने कशाचेही ताळमेळ लागत नाही. या संकेतस्थळावर जिल्हा प्रशासनाची माहिती सहा सप्टेंबर २०१६ ची तर मंत्री, खासदार व आमदार यांची माहिती ता.२१ मार्च २०१७ रोजीची अपडेट केलेली आहे. त्यानंतर कसलीही माहिती या संकेतस्थळावर अपडेट केलेली नाही. या मुळे संकेतस्थळावरून चुकीची माहिती मिळत आहे.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातील सर्वच विभागांनी आपापले व्यवहार अपडेट केले आहेत. संकेतस्थळावर लोकप्रतिनिधी, आमदार खासदार व मंत्री, जिल्हा प्रशासन, पर्यटन, पाणी टंचाई निवारण उपाययोजना, जलयुक्त शिवार योजना, सेवा हमी कायदा, माहितीचा अधिकार कायदा, विविध योजनांचे लाभार्थी, आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नागरिकांची सनद, जिल्हा नियोजन समितीद्वारे मंजूर कामाची यादी, मतदान केंद्राची यादी, बँकांची यादी, नोकरी विषयक, ७/१२, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, ताज्या घडामोडी आदी माहिती अपलोड करणे अभिप्रेत असताना कंधार तालुका संकेतस्थळावर सहा वर्षांपूर्वीचीच माहिती पाहायला मिळते. तालुका प्रशासनाचा वेळकाढूपणा व उदासीनता डिजिटल इंडिया अभियानासाठी मारक ठरत असून नागरिकांना खऱ्या माहिती पासून वंचित राहावे लागत आहे.
संकेतस्थळ अपडेट करणे आवश्यक
डिजिटल इंडियाचा उद्देशच त्या-त्या तालुक्यांची अद्यावत माहिती त्या-त्या तालुक्यांच्या संकेतस्थळावर अपडेट करून देणे असा आहे. परंतू तालुक्याच्या संकेतस्थळावर तसे पहावयास मिळत नाही. कंधार-लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदें यांच्या ऐवजी संकेतस्थळावर आमदार म्हणून खासदार चिखलीकरांचे नाव आहे. असाच प्रकार लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याही बाबतीत असून लातूरचे खासदार म्हणून डॉ. सुनील गायकवाड यांचे नाव आहे. हिंगोलीचे माजी खासदार कै. राजीव सातव यांचे कोरोना काळात निधन झाले. शोकांतिका म्हणजे त्यांचे नाव आजही हिंगोलीचे खासदार म्हणून संकेतस्थळावर आहे. विविध प्रशासकीय अधिकारी, विकासकामे, निधी, हेड याबाबतही मोठी तफावत असून ऐतिहासिक महितीतही मोठ्या चुका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.