नांदेड - गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शासकीय रुग्णालये कमी पडत असून खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनावर नांदेड शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजार असून त्यापैकी ३४४ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवारी (ता. २२) तपासणीसाठी आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता. २३) एक हजार २३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७४२ निगेटिव्ह तर २४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार दोनशेवर जाऊन पोहचली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या तीन हजार ५७७ कोरोना रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालय २८७, जिल्हा रुग्णालय ७६, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ४०, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय ४४ यासह पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि घरी क्वॉरंटाईन असे एक हजार ७२७ रुग्ण आणि खासगी रुग्णालयात ३४४ असे दोन हजार ५१८ रुग्ण ठेवण्यात आले आहेत. तसेच नायगावला १४७, बिलोलीत ४९, मुखेडला १२३, देगलूरला ७७, लोह्यात ३२, हदगावला ५०, भोकरला ४९, कंधारला ३३, बारडला १८, अर्धापूरला १०७, मुदखेडला ४६, माहूरला २३, किनवटला १४३, धर्माबादला ५३, उमरीला ८२, हिमायतनगरला २३, हैदराबाद संदर्भित एक, औरंगाबादला दोन व निजामाबाद येथे संदर्भित एक असे एक हजार ५५ रुग्ण ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
आतापर्यंत दहा हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त
बुधवारी (ता. २३) टाउन मार्केट सोसायटी नांदेड महिला (वय ७८), सहयोगनगर नांदेड पुरुष (वय ७८), बाफना रोड नांदेड महिला (वय ६०), बिलोली पुरुष (वय ४५) आणि कंधार तालुक्यातील कुरुळा येथील पुरुष (वय ७२) या पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ३७१ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी जिल्हा रुग्णालयातील २१, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ११, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम क्वॉरंटाईन ५४, बिलोली ११, धर्माबादचे सहा, मुखेडचे १७, देगलूरचे दोन, खासगी रुग्णालयातील १७, बारडचे सात, मुदखेडचा एक, कंधारचे सहा, नायगावचे ३४ आणि हदगावचे १८ असे २०५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत दहा हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचले पाहिजे- मुक्रमाबाद धान्य घोटाळा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
४८ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
तर नांदेड महापालिकेच्या १०५, नांदेड ग्रामीण १८, कंधार दोन, माहूर एक, हदगाव सात, भोकर दोन, बिलोली सात, देगलूर एक, धर्माबाद १६, किनवट आठ, हिमायतनगर एक, मुखेड ४२, नायगाव २१, लोहा सात, उमरी दोन, परभणी एक, बिदर एक, यवतमाळ दोन, हिंगोली चार आणि वाशिम एक असे २४५ जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार दोनशेवर पोहचली आहे. त्यापैकी दहा हजार १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तीन हजार ५७७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्यापैकी ४८ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहेत. ९१२ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.
कोरोना मीटर
एकुण पॉझिटिव्ह - १४ हजार २००
आज बुधवारी पॉझिटिव्ह - २४५
एकुण मृत्यू - ३७१
आज बुधवारी मृत्यू - पाच
एकुण कोरोनामुक्त - दहा हजार १८३
आज बुधवारी कोरोनामुक्त - २०५
उपचार सुरु - तीन हजार ५७७
अतिगंभीर रुग्ण - ४८
अहवाल बाकी - ९१२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.