nanded police patil recruitment online application last date today 785 post 14th january exam esakal
नांदेड

Police Patil Recruitment : पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरताय? आज शेवटची तारीख

नांदेड जिल्ह्यात ७८५ पदभरती प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ७८५ पोलिस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोमवारी (ता.८ जानेवारी) शेवटची मुदत आहे.या पदासाठी १४ जानेवारी रोजी नांदेड येथे लेखी परीक्षा होणार आहे.

जिल्ह्यातील आठ उपविभागांतर्गत कार्यरत १६ तालुक्यातील पोलिस पाटील पदाची भरती करण्यासाठी १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने https://nanded.gov.in आणि https://nanded.applygov.net या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १ ते ८ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मंगळवारी (ता.९ जानेवारी) पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १०) ते शनिवारी (ता. १३ जानेवारी) या कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. या पदासाठी १४ जानेवारी रोजी लेखी परीक्षा नांदेड येथे होणार आहे.

या परीक्षेत प्रत्येक प्रश्नास एक या प्रमाणे ८० गुणांची परीक्षा असणार आहे. परीक्षेचा अवधी दोन तासांचा असेल. १४ जानेवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत उत्तरपत्रिकेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा nandedrdc@gmail.com या ई-मेलवर आक्षेप सादर करता येतील. तर १५ जानेवारी रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

उपविभागनिहाय पदांची संख्या

  • नांदेड उपविभाग -८८

  • भोकर उपविभाग -८२

  • कंधार उपविभाग -१७०

  • हदगाव उपविभाग -१०१

  • देगलूर उपविभाग -१४३

  • धर्माबाद उपविभाग -६४

  • बिलोली उपविभाग -९७

  • किनवट उपविभाग -४०

  • एकूण पदसंख्या -७८५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT