nanded rain update heavy rainfall in kinvat mahur flood ndrf monsoon weather sakal
नांदेड

Nanded Rain News : पावसाचा जोर कायम...किनवट, माहूर तालुक्यांत अतिवृष्टी; सरासरी ४९.५० मिलिमीटरची नोंद

अतिवृष्टी झालेल्या भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासात शनिवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ४९.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. विदर्भालगत असलेल्या किनवट, माहूर तालुक्यातील सर्वच १३ मंडळात अतिवृष्टी झाली. यात माहूर मंडळात ३०५ मिलीमीटर तर किनवट तालुक्यातील सिंदगी मंडळात २४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टी झालेल्या भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला होता. किनवट तालुक्यात सरासरी १५०.२० मिलीमीटर तर व माहूर तालुक्यात १८५.९० मिलीमीटर पाऊस झाला.

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे किनवट - माहूर व नांदेड - किनवट रोडवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यात ता. एक जूनपासून आजपर्यंत एकूण ३७८.८० मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४२.३० टक्के झाला आहे.

तिघांना सुखरूप बाहेर काढले

माहूर तालुक्यात अती मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात माहूर तालुक्यातील टाकळी या गावातील रामचंद्र भागवत भंडारे (वय २९), भागवत रामचंद्र भंडारे (वय ७५) आणि भाग्यश्री रामचंद्र भंडारे (वय २५) हे त्यांच्या शेतातील आखाड्यावर पुराच्या वेढ्यात अडकून पडले असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रभागास सकाळी सात वाजता मेसेज आला.

त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलिस निरीक्षक मनोज परिहार यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी सकाळी साडेसात वाजता माहूरकडे रवाना करण्यात आली.

दुपारी सव्वातीन वाजता या टीमने तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले. घटनास्थळी माहूर तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार श्री राठोड, तलाठी श्री बाबर यांनी या टीमला मदत केली.

किनवट तालुक्यात मोठे नुकसान

किनवट तालुक्यात सर्व नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची झाली. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकुण १७६ गावातील २१ हजार ४१५ शेतकऱ्यांचे १३ हजार २४६ हेक्टर आर. वरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन पशुधन दगावले आहेत. पिंपरी येथे डोंगराचे माळरान खचून जवळपास ६५ घरांची पडझड झाली आहे. तसेच भंडरवाडी येथील १२ घरांचे व इतर गावातील २५ असे ९० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुख्यालयी रहा ः जिल्हाधिकारी राऊत

नैसर्गिक आपत्तीसाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा सर्व ठिकाणी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्यावतीने बॅरिकेटस लावून पुल बंद करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही अधिकचे नुकसान होणार नाही याबाबत सर्व यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयीन उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पूरात वाहून ११ जनावरेही दगावली

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच दोन दिवसात एकाचा मृत्यू तर जिल्ह्यात मोठे जनावरे सहा तर लहान जनावरे पाच अशा ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ६३ घरांची पडझड झाली आहे. यात बिलोलीतील ५२, किनवट तीन, हदगाव सात, मुदखेड एका घराचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून मिळाली.

ता. २३ ते ता. २६ जुलै दरम्यान इशारा

मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने ता. २२ जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी शनिवारी एक दिवसासाठी ऑरेंज अलर्ट आणि रविवार (ता. २३) ते बुधवार (ता. २६ जुलै) या चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सहस्त्रकुंड, माहूरला तूर्त जावू नये

किनवट तालुक्यातील इस्लापूर मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने सहस्त्रकुंड धबधबा परिसरात जाण्यास स्थानिक नागरिक व पर्यटक यांना मनाई करण्यात आली आहे. तरी कुणीही नागरिक व पर्यटक यांनी पुढील सूचनेपर्यंत सहस्त्रकुंड धबधबा परिसरात जाऊ नये.

तसेच मुसळधार पावसामुळे माहूरला जाणाऱ्या रस्त्यावरील धनोडा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भाविक भक्तांनी पुढील चार दिवस माहूर गडावर येण्याचे टाळावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिवृष्टी झालेले मंडळ (मिलिमीटरमध्ये)

किनवट ः १२५.२५, बोधडी ः १९४.७५, इस्लापूर ः १५७.७५, जलधारा ः १५७.७५, शिवणी ः १५७.७५, मांडवी ः ९६.५०, दहेली ः १२३, सिंदगी ः २४२, उमरी बाजार ः ९६.५०, माहूर ः ३०५, वानोळा ः १७५.२५, वाई बाजार ः १४८.७५, सिंदखेड ः ११४.२५.

२४ तासातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड ः ३८.२०, बिलोली ः ४१.९०, मुखेड ः १२.६०, कंधार ः १३.३०, लोहा ः १८.५०, हदगाव ः ४१.५०, भोकर ः ३९, देगलूर ः ३३.४०, किनवट ः १५०.२०, मुदखेड ः ३४.४०, हिमायतनगर ः ३०.५०, माहूर ः १८५.९०, धर्माबाद ः २६.५०, उमरी ः ३७, अर्धापूर ः ४१.२०, नायगाव ः ३०.८०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT