हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : गिरीष्माच्या ॠतूची चाहूल लागली की, पानगळ झाल्याने राने, जंगली परिसर ओसाड दिसतात तरी मात्र रानात पळसाची झाडे केसरी रंगाच्या फुलाने लगडून गेल्याने वाटसरूचे लक्ष वेधून घेतात. " ग्रीष्मात दिसती ओसाड वने. उदासीनता पांघरून येतात हिरमुसल्या जिवाला पळसाची फूले नवी प्रेरणा देतात. " या काव्य पंक्ती ओटावर साहजिकच येतात.
तालुक्यातील रानात दऱ्याखोऱ्यात पळसाची केसरी रंगाची फुले जाणाऱ्या, येणाऱ्या वाटसरूचे लक्ष वेधून घेत आहेत. उन्हाळ्यात वृक्षांची पानगळ झाल्याने सगळीकडे राने भकास दिसू लागतात. तरी मात्र पळसाची फूले वाटसरूना नवी प्रेरणा देतात. रंगपंचमीची चाहुल लागली की, मुक्तहस्ताने रंगाची उधळण करून पळस, केशरी, लाल रंगाच्या निसर्गाच्या नयनरूपात ओसंडून वाहत आहे. पळसफूले वर्षांतून एकदा तरी मानवी मनावर आदिराज्य करून जातात. पुर्वीच्या जमाण्यात बाजारातील रंग न वापरता धूलिवंदन सन आला की, पळसाच्या फुलापासून बनविलेला नैसर्गिक रंग बनवून मुक्त पणे पळसाच्या फुलाच्या रंगाने उधळण व्हायची. पुर्वीच्या काळी आर्यूर्वेदिक औषधी म्हणून फूलाचा व बियाचा ग्रामीण भागात त्वचा रोगासाठी वापर व्हायचा. देश्यातील बहुतांश भागात पळसाची झाडे पहायला मिळतात.
गिरिष्मात बोडख्या झालेल्या रानात डोंगरदऱ्यात केशरी, लाल रंगात न्हावू घालणारा पळस चोहीकडे पहावयास मिळते. पुर्वीच्या काळात माणसाचे व पळसाच्या झाडाचे अतूट संबंध होते. लग्न समारंभ असो की, घरगुती कुठलाही कार्यक्रम असो पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी व द्रोण जेवनाची काही ओरच मजा असायची, मात्र विज्ञान युगात प्लास्टिकचा मुक्तपणे वापर झाल्याने पळसाच्या पत्रावळिची जागा प्लास्टिकच्या पात्रावळीने घेतल्याने पळसाची पत्रावळी मागे पडली आहे.अश्या बहुगुणी झाडाचे शासनाने संवर्धन करून वृक्ष तोडीवर आळा घालावा. अशी मागणी वृक्ष प्रेमी नागरिकांतून होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.