नांदेड : मागील वीस वर्षापासून किरायाने दिलेल्या दुकानातील आठ लाख ५६ हजार रुपयाचा ऐवज दुकान मालकांनीच परस्पर लंपास केल्याची घटना शहराच्या श्रीनगर भागात ता. २२ आॅगस्ट ते ता. २३ आॅगस्ट दरम्यान घडली. मात्र या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १०) रात्री घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या श्रीनगरमधील मुख्य रस्त्यावर न्यू बेंगल रोल गोल्ड या कृत्रिम दागिने विकण्याचे दुकान आहे. दुकानदार शेख नसिरोद्दाीन शेख आबु ताहेर यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करुन आसरानगर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. इकडे मात्र मुळ दुकान शाहु कुलथे, प्रविण शहाने यांनी संगनमत करुन हे दुकान फोडले. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शेख नसीरोद्दीन यांचे श्रीनगर ते वर्कशॉप या मुख्य रस्त्यावर न्यू बेंगल रोल गोल्ड या कृत्रिम दागिने विकण्याचे दुकान किरायाने चालवित होते. त्यांनी मागील वीस वर्षापासून शाहू कुलथे यांच्याकडून त्यांनी किरायाने घेतले होते. परंतु ता. २२ ऑगस्ट ते ता. २३ ऑगस्ट रात्री नऊच्या सुमारास शाहू कुलथे, प्रवीण शहाणे आणि आणि एका महिलेने संगणमत करुन शेख नसिरोद्दीन यांच्या गैरहजेरीत दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला.
हेही वाचा - नांदेड : भारतीय जवानांचा आत्मसन्मान करणे म्हणजे मानवता धर्म जोपासणे होय- भंते पंय्याबोधी -
आठ लाख ५६ हजाराचा ऐवज लंपास
दुकानातील सर्व बेन्टेक्सचे जवळपास सात लाख ५६ हजार रुपयाचे दागिने व नगदी एक लाख रुपये आणि फर्निचर असा आठ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शेख नसिरोद्दीन शेख यांच्या पत्नीलाही या तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अखेर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शेख नसिरोद्दीन यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके करत आहेत.
मोबाईल चोरी
भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याणनगर येथील ओमप्रकाश मारोतराव पवार यांच्या घरातील बेडरुममध्ये ठेवलेला सॅमसंग कंपनीचा २० हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. हा प्रकार ता. दोन नोव्हेंबरच्या सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास घडला. याप्रकरणी ओमप्रकाश पवार यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री गोणारकर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.