नांदेड : रूग्णाची सेवा कोण करतं? असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टर आधी नाव येईल ते परिचारिकेचं. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वतःच्या सुख दुखाःची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचं जीवन कष्टमय, आव्हानात्मक आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
दरवर्षी ता. १२ मे हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. या रूग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरूवात केली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. ता. १२ मे १८२० ला फ्लॉरेन्स यांचा जन्म इटली देशात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी दररोज रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांची सुश्रुषा केली. त्यामुळे त्यांना ‘द लेंडी विथ लम्प’ ही पदवी देण्यात आली. त्यांनी जगाला रूग्णसेवेचा पायंडा घालून दिला. त्यानंतर त्यांनी १८६० मध्ये लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. त्यांच्यामुळेच आज जगभरात परिचारिकांना शिक्षण घेता येत आहे.
फ्लॉरेन्स यांचे ता. १३ आॅगस्ट १९१० मध्ये निधन झाले. वयाच्या ८० वर्षापर्यंत त्या काम करत होत्या. दरम्यान, बदलत्या काळानुसार या परिचारिकांना भेडसावणा-या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या, सामाजिक-कौटुंबीक बदल, आजाराचे बदलते स्वरूप, वाढलेली आयुमर्यादा यामुळे रुग्णालये व परिचारिकांची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र सरकारी, निमसरकारी, खासगी, नर्सिग होम्स व पंचतारांकित सुपर स्पेशालिटी रुग्णालये या सर्व ठिकाणी परिचारिकांची संख्या मागणीपेक्षा खूप कमी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी परिचारिकांना रात्रपाळी, दिवसपाळी करावी लागते. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
रुग्णसेवा हेच खरे व्रत मानून कार्य करणा-या परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत. एकीकडे कामाचे वाढणारे तास, कमी पगार, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. वास्तविक पाहता वैद्यकीय सेवेचा परिचारिका अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्याशिवाय ही सेवा पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. असे असतानाही परिचारिकांकडे दुर्लक्षच होताना दिसून येत आहे.
नर्सच्या व्यवसायाला चांगली प्रतिष्ठा असून ती जपणे आपले कर्तव्य आहे. या शिवाय ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसुती, कुटुंबकल्याण यासारख्या सर्वात महत्वाच्या कामांची जबाबदारी टाकली जाते. कोविड महामारीमध्ये परिचारिकांनी जीव मुठीत घेऊन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. एकूणच रूग्णसेवेला सुखापेक्षा दुखाःची झालर अधिक आहे. असे असतानाही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत.
- भास्कर डोईबळे.
आपल्या देशात आरोग्य सेवा प्रदान करण्याचे धोरण ठरवताना परिचारिकांचे मत फारसे विचारात घेतले जात नाही, ही खेदाची बाब आहे. मात्र, उपेक्षा व हिणतेने या व्यवसायाकडे बघण्याचे दिवस संपले असून सन्मानाने रुग्णसेवेत मोलाचा वाटा आता परिचारिकांना उचलता येतो. परिचारिका आता कोर्सबरोबरच बीएस्सी, पीएचडी, डॉक्टर, रिसर्चपर्यंत उच्च स्तरावर पोहचल्यामुळे त्यांचाही आता आरोग्य क्षेत्रात सिंहाचा वाटा आहे. नवीन ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येक परिचारिकेने प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ. कुंजम्मा काब्दे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.