नांदेडच्या युवकांचे स्पर्धा परिक्षेत यश... 
नांदेड

नांदेडच्या युवकांचा स्पर्धा परिक्षेत डंका...

अभय कुळकजाईकर

नांदेड - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात नांदेडच्या युवकांनी यश मिळवून आकाशाला गवसणी घातली आहे. नांदेड शहरासह ग्रामिण भागातील युवकांनीही स्पर्धा परिक्षेत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे अनेकांनी कौतुकही केले आहे. 

स्पर्धा परिक्षा आणि अभ्यास म्हटले की पूर्वी मुंबई, पुण्याला जावे लागायचे. पण आता गेल्या दोन चार वर्षापासून परिस्थिती बदलली आहे. नांदेडमध्ये राहूनही अनेकजण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत. त्याचबरोबर त्यात यशही मिळवत आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमानेही स्पर्धा परिक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

पोलीस उपअधीक्षकपदी सतीश कुलकर्णीची निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुलै २०१९ च्या परीक्षेत नांदेडच्या सतीश कुलकर्णी यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. यापूर्वी ते एमपीएससी परीक्षेत उपशिक्षणाधिकारी पदासाठी पात्र ठरले होते तर सध्या जालना जिल्ह्यातील मंठा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सतीश कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण सगरोळी येथील सैनिक शाळेत झाले असून नांदेडच्या एसजीजीएसमधून बी.टेक.(आय.टी.) ची पदवी प्राप्त केली. ते नांदेडच्या पोलिस अधीक्षक ऑफीसमधील कंट्रोल रुमचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय कुलकर्णी यांचे चिरंजीव आहेत. 

प्रफुल्ल तोटावाडची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड 
कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील प्रफुल्ल प्रकाश तोटेवाड या तरूणाची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. यापूर्वी प्रफुल्लची निवड मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदावरही झाली होती. प्रफुल्लची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर अनेकांनी त्यास शुभेच्छा दिल्या. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी प्रफुल्लच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला. प्रफुल्लने आपल्या यशाचे श्रेय वडील प्रकाश तोटेवाड, आई कुसुमबाई तोटेवाड यांच्यासह आपल्या कुटुंबियांना दिले आहे.

वसीमा शेख झाल्या उपजिल्हाधिकारी
स्पर्धा परीक्षेत नांदेडची गुणवान कन्या वसीमा शेख उपजिल्हाधिकारी झाल्या असून मुलींमधून राज्यात तिसरी आली असल्याची माहिती कॉँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली आहे. अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत तिने हे यश संपादन केले. ज्या भागात आम्ही आमचे बालपण घालविले, खेळलो, जिथे आयुष्य जगण्याचे शिक्षण घेतले तो परिसर म्हणजे शिराढोण, उस्माननगर, भुत्याची वाडी, लोंढे सांगवी, जोशी सांगवी, तेलंग वाडी आदी. या भागातून मार्गदर्शक डॉ. गोविंद नांदेडे व शिवाजी कपाळे हे दोन अधिकारी झाले. यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता जोशी सांगवीच्या वासिमा शेख ह्या उपजिल्हाधिकारी झाल्या असून आम्हाला आणि आमच्या भागाला जो आनंद झाला आहे तो शब्दातीत आहे. आमच्या भूमी कन्येला शुभेच्छा, अशा शब्दात त्यांचे कौतुक करण्यात आल्याचे श्री. पांडागळे आले. 

सय्यदा अस्मा झाली राज्य शुल्क विभागात उपायुक्त
नांदेडच्या पोलीस दलात चालक पदावर कार्यरत जाहीर अहेमद यांची ज्येष्ठ कन्या सय्यदा अस्मा झहीर हिने उतुंग भरारी मारली आहे. ती राज्य शुल्क विभाग (इन्कम टॅक्स) मध्ये उपायुक्त पदासाठी पात्र ठरली आहे. खडकपुरा येथील खैरुल उलूम शाळेत तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर यशवंत महाविद्यालयात कला शाखेतून शिक्षण घेतले. वडील झहीर अहमद हे पोलीस विभागात चालक पदावर कार्यरत आहेत. आस्माचे आई वडील दोन्ही पदवीधारक असून तिची लहान बहीण वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे तर दोन लहान बहिणी बारावी व सहावीत शिकत आहेत. युपीएससी परीक्षेचे मागील दहा वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवून तिने या परीक्षेची तयारी केली. अथक परीश्रम, चिकाटी व सबुरी या तीन तत्वांचा तिने परीक्षा तयारीत अवलंब केला. आणि पहिल्याच प्रयत्नात व खुल्या प्रवर्गातून तिला हे उतुंग यश प्राप्त झाले आहे. माझ्या आई वडिलांनी चारही मुलींना अभ्यासासाठी पूर्ण सहकार्य करून मुलींचे भविष्य घडविण्यात नेहमीच तत्पर राहिले. त्यामुळे आज मला हे यश प्राप्त झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीही यशाला गवसणी घालू शकतात, फक्त त्यांनी अथक परीश्रम, चिकाटी, सातत्य व सबुरीने अभ्यास केला पाहिजे. यात हमखास यश प्राप्त होते. संगणकाचा योग्य वापर करून आपणही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT