Nanded Zilla Parishad Primary School 
नांदेड

नांदेड : गुणात्मक प्रयत्न करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

शिक्षक, ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नाला आले यश : आडवळणाची शाळा तरीही उत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात बरडशेवाळा प्रक्षेत्र व चिंचगव्हाण केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेची सिबदरा मक्ता ही शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. शाळेत ७२ मुले आणि ८१ मुली असे एकूण १५३ विद्यार्थी आहेत. भौगोलिक दृष्ट्या तशी ही आडवळणाची शाळा, परंतु शिक्षक गावकरी आणि प्रशासनाच्या सहकार्यातून ही शाळा उत्कृष्ट शाळा ठरली आहे.

या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण तर आहेतच त्यांना त्या त्या इयत्तांची क्षमताही प्राप्त आहे. त्याशिवाय ही मुलं भाषण करतात. चिंतन करतात. बोलतात. आपलं मत मांडतात. चिकित्सक प्रश्न विचारतात. शालेय परिसर आकर्षक आहे. वर्गासमोर लावलेली झाडे, झाडांना केलेली कठडे, शालेय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृह आणि राखलेली स्वच्छता त्यामुळे सगळे वातावरण सकारात्मक वाटते. विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या विषयात जास्त मागे राहतात, त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळे प्रयोग शाळेत सुरू करण्यात आलेले आहेत.

या शाळेतील सर्व शिक्षक उत्साही आहेत आणि तळमळीने काम करतात. सर्व वर्गातील पाठ्यक्रम सारांश रुपाने कागदावर मांडून त्याच्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्रिंटस् काढून विद्यार्थ्याला पुरवून अभ्यास करून घेतला जातो. यांचा आहे पुढाकार

प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनानुसार गटशिक्षणाधिकारी किशन फोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे, केंद्रप्रमुख श्री. बेग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक देशमुख, उपाध्यक्ष दत्ता दुराफे, उमाकांत मिराशे, गोविंद शिंदे, बंडू पोटे, प्रदीप चौकटे, श्यामसुंदर सुपलकर, महानंदा पाटील, कल्पना पायरे, पुष्पलता जाधव यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळेची गुणवत्ता वाढली आहे.

असे आहेत शाळेतील उपक्रम

  • शंभर दिवस वाचन

  • प्रश्नोत्तराच्या सरावामुळे मुलांमध्ये जिज्ञासा

  • आई-बाबांची शाळा

  • विज्ञानाचा गुरुवार

  • गोष्टीचा शनिवार

  • व्हाट्सअप आधारित स्वाध्याय

  • कुंपण भिंत, वर्ग भिंत, चौदाखडीवरील शब्द रेकाटन

  • उतारे रेखाटन

  • मुळाक्षरांच्या दृढीकरणासाठी २४ चित्र, शब्द वाचन

  • कृतीयुक्त साहित्यांतून मुलांचा विकास

यांनी केली शाळेला मदत

  • निआॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

  • शाळेचा माजी विद्यार्थी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांनी एलईडी टीव्ही संच दिला

  • चव्हाण कुटुंबियांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप

  • बंडू पाटील यांच्या प्रयत्नातून दोन एलईडी टीव्ही

  • महादेव मंदिर संस्थानकडून टीव्ही

बीटमधील सर्व शाळांमध्ये गुणवत्ता कशापद्धतीने टिकून राहील यासाठी प्रयत्न सुरु आहे. सर्व अभ्यासक्रमांचा सारांश असलेल्या मोड्यूल्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पनाचे दृढीकरण होण्यास मदत झाली.

- सूर्यकांत बाच्छे, शिक्षण विस्तार अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT