नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोना आपले पाय मजबूत रोवत असतांना नांदेडकर मात्र बिनधास्त असल्याचे पहावयास मिळत आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउन तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा वेशीवर ठेऊन शहरात कोरोना नसल्याचा आव आणत कामाशिवाय घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. मात्र नांदेडकरांनो कोरोना आपल्या शहरात जबरदस्त पाय रोवत असून आपण खबरदारी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. अशा भावना शहरातील काही सुज्ज्ञ नागरिक बोलुन दाखवत आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. पहातापहाता बाधितांची संख्या ही साडतिनशे जवळ गेली आहे. यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून जवळपास जिल्ह्यात आलेल्या दीड लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, माजी महापौर आणि नगरसेवक यांच्यासह डॉक्टर, महावितरण, पोलिस, महापालिका आदींना या कोरोनाची लागन झाली आहे. आतातरी नांदेडकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
कायद्याची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आठवडी बाजार व बँकामध्ये तसेच बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी दिसुन येत आहे. नागरिक प्रशासनाच्या कुठल्याच आवाहनाला साथ देत नाहीत. प्रशासन त्यांच्यापरीने अशा लोकांविरुद्ध कडक पाऊले उचलत आहेत. जिल्ह्यात जवळपास दीड हजाराहून अधिक व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुध्दा नागरिकांच्या वागण्यात काही बदल झालेला दिसून येत नाही. यापूढेही अशा लोकांवर गुन्हे दाखल होतच राहतील असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याची कोरोना विषयी आकडे बोलतात
सर्वेक्षण- एक लाख ४६ हजार ४४४
घेतलेले स्वॅब- सहा हजार ४७
निगेटिव्ह स्वॅब- पाच हजार २४९
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १७
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३४८
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
मृत्यू संख्या- १६
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २७५
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६७
येथे क्लिक करा - Video : आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात कलावंत, कसे? ते वाचाच
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.