नांदेड ः बुधवारी (ता.पाच) प्रलंबित असलेल्या स्वॅब पैकी गुरुवारी (ता.सहा) सायंकाळी प्रयोग शाळेकडून ५२१ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ३१६ निगेटिव्ह तर १६८ जणांचे स्वॅब पाझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे उपचार सुरु असलेल्या सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर ८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे कोरोना मीटर आणि मृत्यू संख्या वाढतच आहे. मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात रोज दिडशे पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत शिवाय मृत्यूचा वाढता आकडा देखील चिंताजनक आहे. बुधवार प्रमाणेच गुरुवारी (ता. सहा) पुन्हा सहा बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत १०९ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी मृत्यू झालेले रुग्णात गोकुळनगर नांदेड पुरुष (वय-६४), देगलुर पुरुष (वय- ७०), चिखलवाडी नांदेड पुरुष (वय- ७४), मुखेड दापका राजा महिला (वय- ८०), मुखेड पुरुष (वय- ७४), नांदेड मकबुलनगर महिला (वय- ६५) या चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारा सरु होते.
हेही वाचा- ‘या’ विद्यापीठात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन
८३ रुग्ण कोरोना मुक्त
बुधवारी घेण्यात आलेल्या अँन्टेजेनी ७५ व आरटीपीसीआर स्वॅब तपासणीद्वारे ९३ असे मिळून १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८६० इतकी झाली आहे. गुरुवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील - एक, मुखेड कोविड केअर सेंटर-दहा, कंधार कोविड केअर सेंटर- सात, कोविड केअर सेंटर, धर्माबाद- तीन, देगलुर कोविड केअर सेंटर- १५, पुंजाब भवन कोविड केअर सेंटर-१४, भोकर कोविड केअर सेंटर-एक, बिलोली कोविड केअर सेंटर- दोन, खासगी रुग्णालय - २९ व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेला एक रुग्ण असे एकुण ८३ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन कोरोना मुक्य झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक हजार २१५ इतकी झाली.
हेही वाचा- अठराविश्वे दारिद्र्यातून केले यशाचे शिखर सर
एक हजार ५२१ बाधित रुग्णावर उपचार सुरु
सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालय-१५२, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय - १९ , पंजाब भवन कोविड सेंटर- ५२९, जिल्हा रुग्णालय ४४, नायगाव कोविड केअर सेंटर ८१, बिलोली कोविड केअर सेंटर - ३५,मुखेड कोविड केअर सेंटर- १२३, देगलुर कोविड केअर सेंटर- १०१, लोहा कोविड केअर सेंटर -सात, हदगाव कोविड केअर सेंटर- ६७, भोकर कोविड केअर सेंटर तीन, उमरी कोविड केअर सेंटर , उमरी कोविड केअर सेंटर- १४, कंधार कोविड केअर सेंटर १२, धर्माबाद कोविड केअर सेंटर २९, किनवट कोविड केअर सेंटर२९ , अर्धापूर कोविड केअर सेंटर १८, मुकखेड कोविड केअर सेंटर १५, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २०, माहुर कोविड केअर सेंटर १०, बारड कोविड केअर सेंटर तीन , महसुलभवन कोविड केअर सेंटर ४९, खासगी रुग्णालय १५२, औरंगाबाद संदर्भित पाच, निजामाबाद संदर्भित दोन, हैदराबाद संदर्भित एक व मुंबई येथे संदर्भित एक असे एक हजार ५२१ बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.