नांदेड - कुपोशीत मातांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ५३ हजार ८३२ मातांना २१ कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पाच कोटी ८७ लाख ५२ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. शासनाच्या अहवालावरुन देशात दर तीन मातांमध्ये एक माता कुपोषित असल्याचे दिसून येते. गरोदर मातांच्या कुपोषणामुळे जन्माला येणारी बालके देखील कमी वजनाची जन्मतात. त्यामुळे जन्मलेल्या बाळांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. मातेकडून बाळाला येणारे कुपोषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या मातृवंदन योजनेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने गरोदर माता शोधुन त्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांना योग्य वेळी योग्य पोषक आहार मिळावा यासाठी अतिशय उत्तम असे काम करुन दाखवले आहे. हेही वाचा- जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष संघटन बांधणीस प्राधान्य देणार जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर १५० दिवसाच्या आता संपूर्ण माहिती शासनाच्या पोर्टलवर नोंद अवश्यक दरम्यान जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा, परिचारिका यांनी मासिक पाळी चुकलेल्या जिल्ह्यातील ५३ हजार ८३२ गर्भवती मातांना शोधुन त्यांची १५० दिवसाच्या आता संपूर्ण माहिती मिळवून ती शासनाच्या पोर्टलवर नोंद करुन घेतली व पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा केला. गर्भवती झाल्यावर सहा महिण्यानंतर त्यांना लाभार्थी प्रपत्र भरुन घेऊन दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला. हेही वाचले पाहिजे - Success Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाकडुन २१ कोटी ६९ लाख ८५ हजार रुपये वाटप तर बाळाच्या जन्मानंतर त्या मातांना तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तिन्ही महिण्यामध्ये या मातांना प्रत्येकी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य विभागास २१ कोटी ६९ लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे. नोंदणी केल्यास योजनेचा लाभ मिळेल गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी गर्भवती झाल्यापासून १५० दिवसाच्या आत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपक्रेंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका, आशा, परिचारिका यांच्याकडे नोंदणी केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. - डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड. |