नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे महापालिकेची यंत्रणा त्या कामाकडे लागली आहे. तर दुसरीकडे पावसाळापूर्व कामे ता. ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. मात्र, पावसाळापूर्व कामे करत असताना महापालिकेसमोर कर्मचारी कमतरतेचा अडसर निर्माण झाला आहे. तरी देखील महापालिकेने शहरातील आत्तापर्यंत २४२ छोट्या मोठ्या नाल्यापैकी २०३ नाल्यांची सफाई केली आहे.
मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने काम करण्यात येत आहे. त्यासाठी तीन जेसीबी आणि दोन पोकलेन मशीनची मदत घेण्यात येत आहे. सदरील काम ता. ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली. सध्या शहरात कोरोना आणि लॉकडाउनमुळे सुरु असलेल्या कामांकडे अधिक लक्ष आणि अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्या इतर कामांना वेळ लागत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...
नियंत्रण कक्ष स्थापन
नांदेड शहरातील सखल भागात पाणी साचण्यामुळे किंवा पुराची परिस्थितीमध्ये तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये हलविण्यासाठी निवारा केंद्र ठरवून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तसेच सहा क्षेत्रीय कार्यालयात २४ बाय सात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मलनिस्सारण विभागाला पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजची फुटलेली झाकणे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धेसाठी पुरेसा ब्लिचिंग पावडर, तुरटी उपलब्ध आहे.
अग्निशमन विभागातर्फे काम सुरु
महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शोध व सुटका पथक निर्माण करण्यात आले हे. तसेच अग्निशमन वाहने, साहित्य व सामुग्री सुसज्य ठेवण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाला मे महिनाअखेर मॉकड्रील घेण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठावरील घाटांवर कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी जून महिन्यापासून जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागाचे प्रथमोपचार दल
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पावसाळ्याच्या काळात प्रथमोपचार दल स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाकडून साथ रोग नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरी हिवताप योजनेतंर्गत किटकजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी कार्यक्रम राबवण्याची संबंधितांना जबाबदारी देण्यात आली आहे. साथरोग व इतर अनुषंगिक आजारांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
हे ही वाचलेच पाहिजे - अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला का गेले...
कार्यवाही करण्याचे आदेश
सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमण तत्काळ हटविण्यास सांगितले आहे. निळ्या रेषेतील मालमत्ताधारकांना नोटीसा देऊन कार्यवाही करण्यात येत आहे. मोडकळीस आलेल्या धोकादायक घरे, इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट बांधकाम विभागाच्या समन्वयाने करुन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.