बारड, (ता.मुदखेड, जि. नांदेड) ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघात बारसगाव ते भोकर राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरण व मजबुतीकरण कामात मुरूम ऐवजी काळ्या मातीची लेपापोती केली जात असल्याची माहिती व पुरावा संबंधित अधिकाऱ्यांना पाठवूनही लॉकडाऊनमध्ये अधिकारी ब्रेक डाऊन असल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाहीन कामा होत आहेत. याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केल्याने गुत्तेदार अभय मिळत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आनंदराव ठिपसे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ लेन दोनपदरी रस्ता रुंदीकरण तसेच मजबुतीकरण काम वेगात सुरू आहे. परंतु संबंधित विभागाचे नियंत्रण नसल्याने मजबुतीकरण व दबाई काम निकृष्ट दर्जाहीन होत असल्याचे पहावयास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण दोन पदरी कामासाठी तसेच गावालगत चौपदरी रस्ता, नाली बांधकाम, सुशोभीकरण या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असून खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने तसेच वेळेत पूर्ण केले नसल्याचा ठपका ठेवून गुजरात राज्यातील रॉयल कन्स्ट्रक्शन कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा - पालमच्या `त्या 42 गावांना मिळणार नुकसान भरपाई
महामार्गाचे काम वर्ग करण्यात आले
यानंतर पुणे येथील निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे महामार्गाचे काम वर्ग करण्यात आले असून काल मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत भोकर विधानसभा मतदारसंघ चांगल्या प्रतीच्या रस्त्याबाबत सर्वश्रुत आहे. यामागचे नेतृत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग केंद्रशासनाच्या नियंत्रणात असल्याने नांदेड लोकसभा मतदारसंघाचे संसद भाजप प्रणित खासदार प्रताप पाटील चिखलीकर असल्याने काम दर्जेदार उच्च प्रतीचे होणे अपेक्षित आहे. अगदी शहराच्या लगत असलेल्या बारसगाव ते भोकर राष्ट्रीय महामार्गावरील ३५ किलोमीटर दोन पदरी रुंदीकरण मजबुतीकरण कामाने वेग घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ निकृष्ट दर्जाहीन काम केले जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आनंदराव टिप्परसे यांनी केली असून या विरोधात एल्गार पुकारला आहे. शंभर कोटींच्या वर मंजुरी बजेटचे काम सुरू असताना टेक्निशियनचा अभाव म्हणजेच शासनाची कमजोरी म्हणावी लागेल. निखिल कन्स्ट्रक्शन काम वेळेत पूर्ण करण्याच्या धावपळीत रात्रंदिवस एक करून काळाचा फायदा उचलत बोगस काम केले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याची ट्रिप उचलून त्याच रस्त्याच्या कामावर इतरत्र वापरली
राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरण मजबुतीकरण कामासाठी मुरमाच्या थराच्या दवाई करणे बंधनकारक असताना मातीने दवाई करण्यात आली आहे. यावर जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर अंथरलेली मातीच्या ढिगाऱ्याची ट्रिप उचलून त्याच रस्त्याच्या कामावर इतरत्र वापरली जाते. सदर काम हे उच्च दर्जाचे असून याबाबत कोणतीही शंकेचे कारण नसून याबाबत संबंधित तक्रार धारकांसमोर रस्ता खोदून गुणवत्ता चाचणी केल्या जाईल. या चाचणीचा खर्च तक्रार धारकांनी द्यावा. संबंधित गुत्तेदाराकडे या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीचा कार्यकाल पुढील पाच वर्षापर्यंत आहे. असे ओम काळे, रस्ते व सार्वजनिक बांधकाम अभियंता, नांदेड यांनी सांगितले.
संपादन - स्वप्निल गायकवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.