नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ता. २४ मार्च पासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात रविवारपर्यंत (ता. १०) आलेल्या ९६ हजार १४७ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना २८ दिवसाच्या होम क्वारंटाईनक्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. त्यांच्या हातावर होम क्वॉरेंटाईनचे शिक्के मारण्यात येऊन निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभाग व अन्य यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व गावांत कोरोना विरोधात जनजागृती करण्यात येत असून आरोग्य विभाग ग्रामीण भागात विशेष दक्षता घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात आले ९६ हजार १४७ नागरिक
जिल्ह्यात परराज्यासह अन्य जिल्ह्यातून परत आलेली संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. अर्धापूर 2983, भोकर 4339, बिलोली 5402, देगलूर 8962, धर्माबाद 1948, हदगाव 6852, हिमायतनगर 2975, कंधार 12500, किनवट 3396, लोहा 7566, माहूर 4585, मुदखेड 2191, मुखेड 14248, नायगाव 7299, नांदेड 2844, उमरी 2781, नांदेड मनपा 5146 असे एकुण 96 हजार 147 नागरिक परप्रांतातून व अन्य जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात परत आले आहेत.
हेही वाचा..........म्हणून कर्जमाफीचे पोर्टल केले बंद
जिल्ह्यात ६२९ पथकाची स्थापना
लॉकडाऊन काळात जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची टिम या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्य विभागामार्फत कोविड-19 अंतर्गत कोरोना, SARI (Severe Acute Respiratory Illness) व ILI (Influenza Like Illness) च्या प्रतिबंध उपाययोजनासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाकरीता आशा, आरोग्य सेवक आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांची 3 हजार 629 पथके तयार करण्यात आली असून या पथकामार्फत ग्रामीण भागात दैनंदिन सर्वेक्षण मागील दिड महिण्यांपासून सातत्याने करण्यात येत आहे.
हेही वाचलेच पाहिजे.....नांदेडातील बालगृहांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
जोखमीचे रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये
या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावात, वाडीवस्त्यांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींची ताप सर्दी खोकला व तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन अति जोखमीच्या व कमी जोखमीच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार कोरोना केअर सेंटर अथवा जिल्ह्याच्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्स येथे संदर्भित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील जनतेने घाबरु नये
ग्रामीण भागातील जनतेने घाबरुन जाऊ नये व आपल्या घरातच राहावे. गरज असेल तरच बाहेर जावे. ताप किंवा कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने नजिकच्या ताप उपचार केंद्रामध्ये जाऊन तपासणी व उपचार करुन घ्यावेत. सर्वेक्षणात आपल्या घरी येणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचऱ्यांना योग्य ती खरी माहिती देऊन सहकार्य करावे. हात वारंवार साबनाने स्वच्छ धुवावेत, संपर्कातील व्यक्तींशी योग्य अंतर ठेवावे, मास्क अथवा स्वच्छ रुमाल वापरावा, साथ पसरु नये यासाठी सर्वांनींच काळजी घ्यावी. तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करुन त्याचा वापर करावा, असेही आवाहन डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.