File Photo 
नांदेड

असे आहे बलशाली भारताच्या विकासासाठी अण्णा हजारेंचे मत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेती हा ग्रामीण विकासाचा पाया असून, शेतकरी व शेतमजूर जगला तरच देश जगेल. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सजीव शेतीकडे वळावे. गाव खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणे शक्य नसल्याचे मत जेष्ठ समाज पद्मभूषण सेवक अण्णा हजारे यांनी पीपल्स महाविद्यालयातर्फे आयोजित एफ.डी.पी. कार्यक्रमांतर्गत बोलताना व्यक्त केले. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मान्यतेनुसार पीपल्स महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पदव्यूत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व संशोधन केंद्र यांच्यावतीने प्राध्यापकांसाठी एक आठवड्याच्या ऑनलाइन एफ.डी.पी. अभ्यासक्रमाचे शनिवारी (ता.सहा) ते (ता.११) जून दरम्यान आयोजन केले आहे. प्राध्यापक विकास कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी नांदेड एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

भौतिक विकासामुळे निसर्गाचा ऱ्हास झाला

या वेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, सचिव प्रा. श्यामल पत्की यांची उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करताना अण्णा हजारे म्हणाले, या देशातील युवा शक्ती जागी झाली तर देश बलवान होईल. भौतिक विकासामुळे निसर्गाचा ऱ्हास झाला आहे. पर्यावरणाचा प्रश्न, तापमान वाढ इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी निसर्गाशी अनुकूल जीवन जगले पाहिले तरच आपण सुरक्षित राहू शकतो.
 
हेही वाचा- या सदस्यांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीस लाखाची मदत ​

दोन गावकऱ्यांनी घेतली अण्णा हजारेंची प्रेरणा

अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून गावाचा विकास करण्याचे ध्येय घेऊन कामाला लागले. नागदरवाडी गावाचे शिल्पकार बाबुराव केंद्रे व काटकळंबा गावाचे शिल्पकार बाबुराव बसवदे गुरुजी यांनी त्यांच्या गावाचा विकासाची माहिती दिली. स्वावलंबी व स्वाभिमानी गावाचे निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचलन उपप्राचार्य तथा विभागप्रमुख डॉ. बालाजी कोम्पल्वार यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. सी.के. हरणावळे, डॉ. डी.एस.  यादव, डॉ. एस.पी. पवार, डॉ. एम. एस. रोडे, डॉ. सौ. आर.डी. डोईफोडे, डॉ. व्ही.डी. जाधव, डॉ. डी.एन. मोरे, प्रा. ए.सी. थोरात, डॉ. विशाल पतंगे, डॉ. बाजीराव वडवळे, डॉ. अमोल काळे, श्री. संदीप गायकवाड, पंढरी गड्डपवार, श्री. राहुल गवारे, प्रा. गणेश खपराळे, शंकर कमटम, अशोक दुधाळे, गणेश घाटोळे यांनी परिश्रम घेतले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT