बियाणींच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूक पदयात्रा sakal
नांदेड

परभणी : बियाणींच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूक पदयात्रा

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा काढण्यात आली

गणेश पांडे

परभणी : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ माहेश्‍वरी सभेच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा काढण्यात आली बियाणी यांची निर्घृन हत्या निषेधार्ह आहे. त्यातून शासन व पोलिस प्रशासन यांची निष्क्रियता सिध्द होत आहे, असे स्पष्ट करीत जिल्हा माहेश्‍वरी सभा, तालुका माहेश्‍वरी सभा, शहर महिला मंडळ व परभणी तालुका माहेश्‍वरी युवा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करा, विशेषतः त्यामागील सूत्रधारांना अटक करा व त्यांच्या विरोधात जलदगतीच्या न्यायालयात खटला उभा करीत संबंधित आरोपी व सूत्रधारांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या संतप्त पदाधिकार्‍यांनी दिली. या मागणीसाठी ही मूक पद यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. आंदोलनात खासदार संजय जाधव हे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT