नांदेड : पाल्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. प्रत्येक पालक पाल्यांवर संस्कार घडावेत यासाठी प्रयत्न करतात. पालकांची स्वतःची जीवनमूल्ये, श्रद्धा आणि चालीरीती मुलांच्या व्यक्तिमत्त्वास आकार देतात. मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी पालकांमध्ये असलेला आत्मविश्वास प्रत्येक कुटुंबात परस्पर संवादाचे, स्नेहाचे, आदराचे वातावरण निर्माण करू शकतो.
आजच्या शिक्षण व्यवस्थेत अध्यापन एक कला व शासन आहे, असे म्हटले जाते. त्यानुसारच पालन करणे म्हणजे पालकत्व हेसुद्धा एक कला व शास्त्र आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फार जागरुक झाल्याचे दिसून येतात. ही जागरुकता समाजाच्या सर्व स्तरावर पाहावयास मिळते; पण मुलांच्या मानसिक गरजांविषयी बहुतांशी पालक आजही अनभिज्ञच असल्याचे बघायला मिळत आहे. याची जाणीव संबंधित पालकांमध्ये दिसूनही येते; मात्र ते दुरुस्त करण्यासाठीचा वेळ मात्र त्यांच्याकडे नसल्याचे वास्तव आहे.
अपेक्षांचा हट्ट नको
पूर्वनुभवाच्या साह्याने वास्तव परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी तसेच भविष्यकालीन जीवन सुखी होण्यासाठी विचार करण्याची क्षमता मानवामध्ये आहे. या विचारशक्तीचा वापर करून प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत विचार करत असतो. आजची बदलती परिस्थिती, स्पर्धात्मक वातावरण यात वावरत असताना पालकांच्या विचाराचे मंथन होऊन पाल्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. यात काही गैरही नाही. माझ्या मुलाने हे केले पाहिजे, ही अपेक्षा रास्त आहे; पण ते केलेच पाहिजे, हा हट्ट मात्र नको. या हट्टातून आज पाल्य व पालक यांच्याबाबत अनेक वाईट घटना पाहावयास मिळत आहेत.
हे देखील वाचलेच पाहिजे - जंगलातील बंदूकधारींना समजले नक्षलवादी, पण पुढे काय झाले वाचा...
अपेक्षा ठेवताना हे तपासावे
आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवत असताना त्याच्या मानसिक, भावनिक व बौद्धिक क्षमतांची जाण पालकांना आवश्यक आहे. एखादे कैशल्य विकसित करत असताना या कौशल्य प्राप्तीसंदर्भातील आवश्यक क्षमता आपल्या पाल्यामध्ये आहेत का? याचा विचार होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्यास पाल्यांवर दडपण येईल, अशी कृती पालकांनी टाळली पाहिजे. त्याला विश्वासात घेऊन त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत व योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
पालकांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी
एकूणच पाल्यांच्या अंगी चांगले गुण येण्यासाठी केवळ पाल्यानेच प्रयत्न करावेत, ही अपेक्षा चुकीची आहे. त्याच्या यशामध्ये अनेक घटकांचा समावेश असतो आणि एखादी चांगली गोष्ट आत्मसात करत असताना ती कायमस्वरूपी मनावर कोरण्यासाठी बराच कालावधी लागतो, ही वस्तुस्थिती पालकांनी लक्षात घेतली पाहिजे.
- डॉ. सदाशिव कुलकर्णी (ज्येष्ठ समुपदेशक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.